ETV Bharat / state

मातृदिन विशेष : रुग्णसेवेबरोबरच आपल्या मुलींचीही काळजी घेते 'ती' - कोरोना सर्वाधिक संकटाचा काळ

एक आईच असते जी सर्व बाजूने सांभाळून घेत असते. परिस्थिती कशी सांभाळायची हे आई व्यवस्थित ठरवत असते आणि त्यात ती यशस्वीही होत असते. मुलींचा अभ्यास कसा घ्यायचा? रुग्णालयातून परतल्यावर त्यांना वेळ कसा द्यायचा? त्यात मुलाबाळांसह स्वतःला सुरक्षित ठेवायचे. याचीही काळजी त्यांना दैनंदिन घ्यावी लागते.

रुग्णसेवेबरोबरच आपल्या मुलींचीही काळजी घेते 'ती'

author img

By

Published : May 9, 2021, 9:14 PM IST

Updated : May 9, 2021, 10:16 PM IST

लातूर - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चोवीस तास सेवा देत डॉक्टर या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. रुग्णसेवा व आपल्या कुटुंबाची काळजी या दोन्हीही जबाबदाऱ्या अगदी प्रामाणिकपणे डॉक्टरांना दैनंदिन पार पाडाव्या लागत आहे. जागतिक मातृत्व दिनानिमित्त लातूरच्या स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. ज्योती सूळ यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधून डॉक्टरांची भूमिका जाणून घेतली आहे.

रुग्णसेवेबरोबरच आपल्या मुलींचीही काळजी घेते 'ती'

कोरोना सर्वाधिक संकटाचा काळ'

प्रसूती व स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून डॉ. ज्योती सूळ 10 वर्षापासून लातुरमध्ये सेवा देत आहेत. मागील दहा वर्षाच्या कालावधीत सर्वाधिक संकटाचा काळ म्हणून कोरोना संसर्गाचा उल्लेख करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात सेवा बजावून घरी परतल्यानंतर आपल्या परिवाराची काळजी त्या प्राधान्याने घेतात. मागील वर्षभरात डॉक्टर म्हणून सेवा बजावताना एक जबाबदार माता म्हणूनही त्यांनी भूमिका साकारली आहे. डॉ. ज्योती सूळ यांना दोन मुली आहेत. ओजस्वी 6 तर वर्तिका 9 वर्षाची आहे. मी स्वभावाने रागावणारी असले तरी बाळांना व परिवारासाठी अनेकदा हळवी माता झाली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

'आईच असते जी सर्व बाजूने सांभाळून घेत'

कोरोना काळात सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रसंगात स्वतःला सिद्ध करताना या काळात मुलाबाळांना वेळ देता आला व मानवतेच्या भूमिकेतून सेवा करता आली. यासाठी भाग्य लागतं, असेही त्या म्हणाल्या. एक आईच असते जी सर्व बाजूने सांभाळून घेत असते. परिस्थिती कशी सांभाळायची हे आई व्यवस्थित ठरवत असते आणि त्यात ती यशस्वीही होत असते. मुलींचा अभ्यास कसा घ्यायचा? रुग्णालयातून परतल्यावर त्यांना वेळ कसा द्यायचा? त्यात मुलाबाळांसह स्वतःला सुरक्षित ठेवायचे. याचीही काळजी त्यांना दैनंदिन घ्यावी लागते. ज्या दिवशी कोरोना रुग्णांची सेवा अगदी जवळून करण्याचा प्रसंग आला त्यानंतर घरी आल्यावर मुलाबाळांपासून स्वतःला दूर ठेवणे हे सर्व सकारात्मकरित्या त्यांनी वर्षभर सांभाळले आहे. त्यातून थोडीशी काळजीही वाटते. मुलाबाळांसह एक जबाबदार पत्नी म्हणूनही परिवाराची काळजी घेण्यास त्या प्राधान्य देतात. रुग्णालयात रुग्णांची सेवा देताना सतत आपले कुटुंब डोळ्यासमोर ठेवून सर्व आवश्यक काळजी त्या आजही घेत आहे.

हेही वाचा -उदरनिर्वाहासाठी परमिंदर कौर यांची जिद्द; नऊ वर्षांपासून नांदेडातील रामघाट स्मशानभूमीत वास्तव्य

Last Updated : May 9, 2021, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.