ETV Bharat / state

लातुरचा पाणीपुरवठा बंद... कोरड्या आंघोळीने मनसेने केला निषेध - लातूर पालिका बातमी

महावितरणचे कोट्यवधीचे बिल अदा न केल्याने काही जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे लातुरकरांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केला आहे.

mns-protest-against-municipality-in-latur
कोरड्या आंघोळीने मनसेने केला निषेध....
author img

By

Published : Feb 22, 2020, 9:00 PM IST

लातूर- शहरातील पाणी पुरवठा सध्या खंडीत आहे. मनपाने वेळेवर वीज बिल भरले नसल्याने महावितरण कंपनीने पाणी उपसा करणाऱ्या प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून लातुरकरांना पाणी पुरवठा होत नाही. या पाणीटंचाईला मनपाच जबाबदार असल्याचे म्हणत आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावरच कोरडी अंघोळ करुन निषेध व्यक्त केला.

कोरड्या आंघोळीने मनसेने केला निषेध....

हेही वाचा- आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी

सातत्याने लातूरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मांजरा धरणातील पाणी पातळी पाहता दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र, आता महावितरणचे कोट्यवधीचे बिल अदा न केल्याने काही जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यामुळे लातूरकरांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेध केला आहे.

शहरात 93 हजार मालमत्ता धारक आहेत. यातील काही हजार लोक सोडले तर सर्वांकडे मनपाची नळ जोडणी आहे. या सर्वांना आता पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याच प्रश्नाला घेऊन मनसेने आज महापालिके समोर कोरडी आंघोळ करत आंदोलन केले आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.