लातूर - पालकमंत्र्यांना कोरोना प्रदुर्भावाच्या काळात ताप-खोकला आल्याने त्यांनी कोरोनाची तपासणी केली होती. यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून मी पूर्णपणे बरा असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले आहे.
पालकमंत्री अमित देशमुख सध्या मुंबईत आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार असून बैठका आणि इतर कामासाठी त्यांना बाहेर पडावे लागत होते. याच दरम्यान त्यांना खोकला आणि ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. डॉ. तात्याराव लहाने यांच्या सहकार्याने ही तपासणी केली असून रिपोर्ट त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे काळजी नसावी, मी पूर्णपणे बरा असल्याचे ट्वीट अमित देशमुख यांनी केले आहे.
दरम्यान, लातूरमध्ये गेल्या आठवड्यात आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून इतर निगराणीखाली असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. तसेच या आठ रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.