ETV Bharat / state

वैद्यकीय अधिकारी एक अन् रुग्ण हजार.. लातूर जिल्ह्यातील किनगाव आरोग्य केंद्रच 'सलाईनवर'

author img

By

Published : Jan 11, 2022, 8:00 PM IST

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा (Kingaon Health Center latur) गाडा एकच वैद्यकीय अधिकारी हाकत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी अडीच महिन्यांपासून दुसरे वैद्यकीय अधिकारी दीर्घ मुदतीच्या रजेवर (Medical officer on leave at kingaon) गेले आहेत. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा भार पडला आहे.

Kingaon Health Center latur
Kingaon Health Center latur

लातूर - अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा (Kingaon Health Center latur) गाडा एकच वैद्यकीय अधिकारी हाकत असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असली तरी अडीच महिन्यांपासून दुसरे वैद्यकीय अधिकारी दीर्घ मुदतीच्या (Medical officer on leave at kingaon) रजेवर गेले आहेत. त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा भार पडला आहे.

माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे बीड, लातूर, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सिमेवरील बाजारपेठेचे गाव आहे. किनगाव आरोग्य केंद्राअंतर्गत 5 उपकेंद्रे असून त्यामध्ये 30 गावांचा समावेश आहे. त्यामुळे जवळपास 33 हजार लोकसंख्येच्या आरोग्याची सेवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. या केंद्रात दैनंदिन २०० ते २५० रुग्णांची बाह्यरुग्ण तपासणी केली जात असून बाजारदिनी याची संख्या अधिक असते.

अहमदपूर तालूक्यातील किनगाव हे प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असल्याने या ठिकाणी अपघाती रुग्णसंख्याही मोठ्या प्रमाणात असते. सध्या एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असल्याने कोविड लसीकरण, कोविड तपासणी, प्रयोगशाळा तपासणी, गरोदर माता तपासणी, असंसर्गिक आजार अशा रुग्णांना आरोग्य सेवा देणे कठीण होत आहे.

वैद्यकीय अधिकारी तीन महिन्यापासून रजेवर -
किनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे भरण्यात आली आहेत. सध्या डॉ. किशोर कांदे हे वैद्यकीय अधिकारी मागील 2-3 महिन्यांपासून रजेवर आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी त्यांना तात्काळ कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतू अद्याप ते रुजू झाले नसून पर्यायी व्यवस्था म्हणून येथील पदावर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करण्यात येतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.