ETV Bharat / state

MBBS Paper Leaked in Latur : एमबीबीएसचा पेपर लातुरात फुटला, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर - Latur government medical college

हिवाळी सत्राच्या एमबीबीएसच्या मायक्रोबायोलॉजी ( Microbiology winter medical exam ) या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना देण्यात आली होती. येथील प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली ( Latur government medical college ) आहे. त्यामुळे तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर
author img

By

Published : Mar 14, 2022, 5:05 PM IST

लातूर - राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने ( Maharashtra University of Health Science ) घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएसचा पेपर लातुरात फुटल्याची ( MBBS paper leaked in Latur ) धक्कादायक बाब समोर आली आहे.

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा ( winter medical exam ) सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रो बायोलॉजी विषयाचा पेपर शुक्रवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आला होता. लातूरच्या स्व. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ( government medical college Latur ) विद्यार्थ्यांच्या हातात हा पेपर पडताच त्यांना आश्चर्य वाटले. कारण जो पेपर त्यांना नोव्हेंबर महिन्यात सराव परिक्षेत देण्यात आला होता. तोच पेपर त्यांना शुक्रवारी झालेल्या हिवाळी सत्राच्या परिक्षेत देण्यात आला. यामुळे चार महिन्यांपूर्वी हा पेपर फुटला होता हे पुन्हा सिद्ध झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा-Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी सामनासह दुचाकी उचलली; व्हिडिओ होतोय व्हायरल

तात्पुरती परीक्षा रद्द
हिवाळी सत्राच्या एमबीबीएसच्या मायक्रोबायोलॉजी ( Microbiology winter medical exam ) या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना देण्यात आली होती. येथील प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली ( Latur government medical college ) आहे. त्यामुळे तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

हेही वाचा-Home Minister About Fadnavis Interrogation : 'देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली' - गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

रद्द झालेली परीक्षा 26 मार्चला घेण्यात येणार

रद्द झालेली परीक्षा 26 मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत घेण्यात येणार आहे. या संदर्भात परीक्षा मंडळाने गंभीर दखल घेत घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने एमबीबीएसच्या ( 2019 ) द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजी- प्रथम या विषयाची शंभर गुणांची लेखी परीक्षा शुक्रवारी दुपारच्या सत्रात अडीच ते साडेपाच दरम्यान राज्यातील 41 केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेला सहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा-Bail denied to Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, लातुरचे पालकमंत्री अमित देशमुख हेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यामुळे पेपर फुटीच्या प्रकरणावर काय कारवाई होते, याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.