ETV Bharat / state

लातुरातील बाजारपेठेत लगबग; नियम-अटीसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता

टप्प्याटप्प्याने बाजारपेठ खुली केली जात आहे. सुरुवातीस किराणा दुकान, भाजी मंडई, मटण- चिकन शॉप, मेडिकल यासारख्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शुकशुकाट असणारे रस्ते दोन दिवसांपासून गजबजलेले पाहावयास मिळत आहेत.

लातुरातील बाजारपेठेत लगबग; नियम-अटीसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता
लातुरातील बाजारपेठेत लगबग; नियम-अटीसह लॉकडाऊनमध्ये शिथिलता
author img

By

Published : Aug 14, 2020, 1:34 PM IST

लातूर - महिन्याभराच्या लॉकडाऊनंतर लातूर शहरात नागरिकांसह वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली असून किराणा दुकान, भाजी मंडई, मेडिकल तसेच इतर सेवा सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियमांचे पालनही लातूरकरांकडून केले जात आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 जुलैला 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. 15 दिवसांनंतर नगरपालिका आणि नगरपरिषद या ठिकाणी सर्व व्यवहार सुरू करण्यात आले होते. मात्र, लातूर शहरात कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याने 15 ऑगस्टपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली होती. आता टप्प्याटप्प्याने बाजारपेठ खुली केली जात आहे. सुरुवातीस किराणा दुकान, भाजी मंडई, मटण- चिकन शॉप, मेडिकल यासारख्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शुकशुकाट असणारे रस्ते दोन दिवसांपासून गजबजलेले पाहावयास मिळत आहेत.

17 ऑगस्टपर्यंत शहरातील सर्व उद्योग; व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी व्यापारी उद्योजकांनी अँटीजन टेस्ट करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. त्यानुसार शहरात दिवसाकाठी 3000 टेस्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 4696 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 2479 जणांवर उपचार करून डिस्चार्ज झाला आहे तर 2057 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 160 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने उद्योग-व्यवसाय सुरू केले जात आहे.

महिन्याभरापासून सर्व व्यवहार ठप्प होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. आता सर्व काही काळजी घेऊन बाजारपेठ सुरू केली जात आहे. शहरातील 7 केंद्रावर अँटीजन टेस्ट केली जात आहे. नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.