ETV Bharat / state

खासदारांच्या घरापासून आंदोलनाचा श्रीगणेशा; मराठा क्रांती मोर्चाचा लातुरात घंटानाद

author img

By

Published : Sep 15, 2020, 4:27 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर राज्यातील मराठा समाज संतप्त झाला आहे. त्याचप्रमाणे लातुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजातील सर्व लोकांनी मिळून खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.

maratha kranti morcha ghantanad agitation in front of mp sudhakar shrungare house
खासदारांच्या घरापासून आंदोलनाचा श्रीगणेशा

लातूर - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आता समाजाने आंदोलनाला सुरवात केली आहे. जिल्हा बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवारी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर घोषणाबाजी करीत घंटानाद आंदोलन केले. आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी समाजाची भूमिका मांडावी याकरता जिल्ह्यात आंदोलनाला सुरवात झाली आहे.

खासदारांच्या घरापासून आंदोलनाचा श्रीगणेशा; मराठा क्रांती मोर्चाचा लातुरात घंटानाद

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून आता जिल्हास्तरीय बैठका पार पडत आहेत. रविवारी लातुरात मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली होती. जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर घंटानाद करण्याचे ठरवले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर घंटानाद करत ठिय्या देण्यात आला होता. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने समाजाच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधी यांनीच समाजाच्या भावना सरकारसमोर मांडाव्यात आणि आरक्षणावरील स्थगिती उठवावी अशी मागणी होऊ लागली आहे.

मराठा क्रांती मोर्चा मूक मोर्चा नाही तर ठोक मोर्चा काढणार आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नाही तर लोकप्रतिनिधींनाच जाब विचारला जाणार आहे. मंगळवारी खा. शृंगारे यांच्या घरासमोर आंदोलन केले. मात्र, सध्या अधिवेशन सुरू असल्याने सुधाकर शृंगारे हे लातूरमध्ये नाहीत. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवानी आपल्या भावना पोहचत्या केल्या आहेत. यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आमदारांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे तर 17 सप्टेंबरला पालकमंत्री अमित देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे.

खासदार सुधाकर शृंगारे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. मात्र, समाजाची मागणी आणि असलेली स्थिती याचा गांभीर्याने विचार करावा याबाबत खासदार सुधाकर शृंगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.