ETV Bharat / state

लातूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचा राडा

लातूर ग्रामीणचे उमेदवार सचिन देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांनी राडा घातला. प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही देशमुख गांभीर्य न दाखवता मतदारसंघातून गायब राहिले आहेत. सचिन देशमुख यांनी पक्षाशी आणि शिवसैनिकांशी दगाबाजी केल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला आणि एकच गोंधळ उडाला.

Latur shivsena press conference
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:05 PM IST

Updated : Oct 19, 2019, 4:32 PM IST

लातूर - लातूर ग्रामीणचे उमेदवार सचिन देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांनी राडा घातला. प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही देशमुख गांभीर्य न दाखवता मतदारसंघातून गायब राहिले आहेत. सचिन देशमुख यांनी पक्षाशी आणि शिवसैनिकांशी दगाबाजी केल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला आणि एकच गोंधळ उडाला.

शिवसेना उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचा राडा

हेही वाचा - EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ राहिला आहे. यावेळी मात्र, युतीची गणिते जुळवून घेण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि उमेदवारी नवख्या सचिन देशमुख यांना देण्यात आली. यावरून तिकीट जाहीर झाल्यापासून महायुतीमधील घटक पक्ष तसेच सेनेमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यात युती सरकार असूनही उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने प्रचार करीत नाही. मतदारसंघातून गायब आहे, असे एक ना अनेक आरोप सचिन देशमुख यांच्यावर केले जात होते. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी थेट उमेदवारालाच लक्ष्य करत पक्षाशी तुम्ही गद्दारी केली आहे, तुमच्या अशा वागण्याने पक्षाची बदनामी झाली, असे आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन

आज प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही त्यांनी साध्या प्रचारालाही सुरुवात केली नाही. रामदेव बाबा प्रचाराला येणार असल्याचे सांगत त्यांनी फसवणूक केली आहे. याचा जाब आता निवडणुकीच्या निकालानंतर विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर उमेदवारी ही पक्ष प्रमुखांच्या आदेशावरून दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात माझे काम आहे. विरोध करणारे खरे शिवसैनिकच नाहीत, असे म्हणत उमेदवार सचिन देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा - मातोश्रीच्या अंगणात प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेची डोकेदुखी !

मात्र, उमेदवरीवरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सचिन देशमुख माध्यमांसमोर आले खरे मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यांची पंचाईत केल्याचे दिसून आले.

Intro:शिवसेना उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत शिवसैनिकांचाच 'राडा'
लातूर : लातूर ग्रामीणचे उमेदवार सचिन देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांच राडा घातला. प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही यांनी गांभीर्य न दाखवता मतदारसंघातून गायब राहिला आहे. सचिन देशमुख यांनी पक्षाशी आणि शिवसैनिकांशी दगाबाजी केल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सुर्यवंशी यांनी भर पत्रकारपरिषदेत केला आणि एकच गोंधळ उडाला.

Body:लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ राहिला आहे. यावेळी मात्र, युतीची गणिते जुळवून घेण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला आणि उमेदवारी नवख्या सचिन देशमुख यांना देण्यात आली. यावरून तिकीट जाहीर झाल्यापासून महायुतीमधील घटक पक्ष तसेच सेनेमधील पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यात युती सरकार असूनही उमेदवार विजयी होण्याच्या दृष्टीने प्रचार करीत नाही... मतदारसंघातुन गायब आहे असे एक ना अनेक आरोप सचिन देशमुख यांच्यावर केले जात होते. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप सूर्यवंशी यांनी थेट उमेदवार यांनाच टार्गेट करीत पक्षाशी तुम्ही गद्दारी केली आहे.... तुमच्या आशा वर्तणुकीमुळे पक्षाची बदनामी झाली असे आरोप केल्याने एकच गोंधळ उडाला. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असतानाही यांनी साधा प्रचारालाही सुरवात केली नाही. रामदेव बाबा प्रचाराला येणार असल्याचे सांगत त्यांनी फसवणूक केली आहे. याचा जाब आता निवडणुकीच्या निकालानंतर विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर उमेदवारी ही पक्ष प्रमुखांच्या आदेशावरून दिली जाते... गेल्या अनेक वर्षोपासून या मतदारसंघात माझे काम आहे. विरोध करणारे खरे शिवसैनिकच नाहीत असे म्हणत उमेदवार सचिन देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

Conclusion:मात्र, उमेदवरीवरून आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सचिन देशमुख माध्यमांसमोर आले खरे मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यांची पंचाईत केल्याचे दिसून आले.
Last Updated : Oct 19, 2019, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.