ETV Bharat / state

....म्हणून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची गणेश मंडळांना हात जोडून विनंती - जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नदी- नाले, विहिरी कोरड्या असून, लातूरकरांना 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन कुठे करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या समोर आहे.

शांतता समिती बैठक
author img

By

Published : Sep 10, 2019, 9:51 PM IST

Updated : Sep 10, 2019, 10:15 PM IST

लातूर - गणेशोत्सवाच्या काळात पावसाची कृपादृष्टी राहण्यासंबंधी आशावाद जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच्या शांतता समितीच्या बैठकीत केला होता. मात्र, पावसाची अवकृपा कायम राहिल्याने गणेश मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह पोलीस प्रशासनाने शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांची बैठक घेतली. यामध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन घरातच करावे, तसेच मंडळांनी गणेश मूर्ती दान कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळांना आवाहन केले

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे नदी- नाले, विहिरी कोरड्या असून, लातूरकरांना 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जन कुठे करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या समोर आहे. यापूर्वी शांतता समितीच्या बैठकीतही जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मूर्तींचे दान करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा लातुरात रेल्वेने पाणी आणल्याचे बील पालिकेच्या माथी, मदत केल्याचे बील कसे मागता - आमदार अमित देशमुख

यानंतर आता घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करण्यासोबत सार्वजनिक मंडळांनी विसर्जनाच्या ठिकणी गणेश मूर्ती जमा करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच या मूर्त्या शहरातील मूर्तिकारांना दान केल्या जाणार आहेत.

हेही वाचा हिंगोलीत चक्क जिल्हाधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश !

त्यामुळे आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन सांगळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे व पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक बोलावून हा निर्णय घेतला. आता लातूरकर याला कसा प्रतिसाद देतील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. संबंधित बैठकीत मंडळांच्या अध्यक्षांनीही विविध पर्याय जिल्हा प्रशासनासमोर ठेवले. मात्र, सर्वानुमते हा मूर्तीदानाचा निर्णय घेण्यात आला.

जिल्हाधिकारीही विसर्जन घरातच करणार

यंदा पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी जलस्रोतच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. लातूरकरांनी घरच्या मूर्तींचे विसर्जन घरातच करावे, एवढेच नाही तर मी देखील गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

Intro:....म्हणून लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची गणेश मंडळांना हात जोडून विनंती
लातूर : गणेशोत्सवाच्या काळात पावसाची कृपादृष्टी राहील असा आशावाद जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच्या शांतता समितीच्या बैठकीत केला होता. मात्र, पावसाची अवकृपा कायम राहिली असून गणेश मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे असा सवाल उपस्थित झाला होता. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह पोलीस प्रशासनाने शहरातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांची बैठक घेतली आणि घरगुती गणपतींचे विसर्जन घरातच करावे आणि मंडळांनी गणेश मूर्तीचे दान करावे अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

Body:लातुरात यंदा सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी- नाले, विहिरी कोरड्याठाक आहेत. लातूरकरांना 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यंदा विघ्नहर्ताचे विसर्जन करावे कुठे असा सवालही येथील जिल्हा प्रशासनाच्या समोर आहे. यापूर्वी शांतता समितीच्या बैठकीतही जिल्हाधिकारी यांनी गणेश मूर्तींचे दान करण्याचे आवाहन केले होते. यावर आज शिक्कामोर्तब झाले असून घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करावे आणि मंडळांनी विसर्जनाच्या ठिकणी गणेश मूर्तीं जमा करायच्या आहेत. याकरिता महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन याची व्यवस्था करणार आहे. तर शहरातीलच मूर्तिकारांना या मूर्त्यांचे दान केले जाणार आहे. त्याअनुषंगाने मंडळांनी यंदा विसर्जन करताना घरगुती गणपती विसर्जनासाठी न घेता घरातच विसर्जन करण्याचे सांगावे असा सल्ला दिला आहे. शहरातील एकही स्रोतांमध्ये पाणी नसल्याने विसर्जन कुठे करावे असा सवाल आहे. त्यामुळे आज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन सांगळे, मनपाचे उपायुक्त संभाजी वाघमारे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी गणेश मंडळांच्या अध्यक्षांची बैठक बोलावून हा निर्णय घेतला. आता लातूरकर याला कसा प्रतिसाद देतील हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Conclusion:या बैठकीत मंडळातील अध्यक्षांनीही विविध पर्याय जिल्हा प्रशासनासमोर ठेवले मात्र सर्वानुमते हा मूर्तीदानाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारीही गणेश मूर्तींचे विसर्जन घरातच करणार
यंदा पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विसर्जनासाठी जलस्रोतच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. लातूरकरांनी घरच्या मूर्तींचे विसर्जन घरातच करावे एवढेच नाही तर मी देखील गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
Last Updated : Sep 10, 2019, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.