ETV Bharat / state

लातूरच्या कोरोना रुग्ण संख्येत घट; जळकोटचे कोविड सेंटर रिकामे - लातूर कोरोना रुग्णसंख्या न्यूज

मार्च महिन्यापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, आता कोरोनाचा कहर काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि आरोग्य विभागासाठी दिलासादायक बातमी आली आहे. येथील रुग्णसंख्येत घट झाली आहे.

Corona Update
कोरोना अपडेट
author img

By

Published : Oct 26, 2020, 12:21 PM IST

लातूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात दिवसाला 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते. मात्र, ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासून रुग्ण संख्या मंदावली असून जळकोट येथील कोविड सेंटर रिकामे झाले आहे.

कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. परंतु काळाच्या ओघात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यात रुग्ण संख्येत होणारी घट ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे 19 हजार 960 रुग्ण आढळले होते. यातील उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या ही 18 हजार 463 एवढी आहे. सद्यस्थितीला 909 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी जिल्ह्यात 502 जणांची तपासणी करण्यात आली होती. पैकी 82 पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 96 जणांना डिस्चार्जही देण्यात आला.

लातूर, उदगीर, निलंगा, औसा या तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होता. तर जळकोट, शिरुरानंतपाळ, देवणी या तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होते. गेल्या दोन आठवड्यांपासून जळकोट येथील कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नाही. जळकोट तालुक्यात दोन रुग्ण आहेत मात्र, त्यांच्यावर इतरत्र उपचार सुरू आहेत. तालुक्यातील 20 गावांमध्ये आद्यपपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. एकंदरीत कोरोना रुग्णांचे प्रमाण घटत असल्याचे चित्र आहे. मात्र, असे असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जळकोट, देवणी प्रमाणेच इतर तालुक्यांमध्येही उपाययोजना राबवून रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.