ETV Bharat / state

विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात

जिल्ह्यातील औसा, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या 3 मतदारसंघातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यानुसार लातूर शहरमधून अमित देशमुख, तर औसा मतदार संघातून बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने दिवंगत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

विलासराव देशमुखांचे दोन्ही चिरंजीव विधानसभेच्या आखाड्यात
author img

By

Published : Sep 20, 2019, 5:11 PM IST

लातूर - जिल्ह्यातील औसा, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या 3 मतदारसंघातील उमेदवारांची नावे काँग्रेसने जाहीर केली आहेत. त्यानुसार लातूर शहरमधून अमित देशमुख, तर औसा मतदार संघातून बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने दिवंगत विलासराव देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

लातूर ग्रामिणचे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसेंना उमेदावरी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. घराणेशाहीला विरोध म्हणून धीरज देशमुख यांच्या नावाचा उल्लेख टाळला जातो की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते जि.प. सदस्य या कालावधीतच धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमधून तयारी सुरू केली होती. मांजरा, रेणा आणि विकास या तीनही कारखान्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रावरील त्यांची पकड मजबुत असल्याने त्यांना त्याचा फायदा होईल. गतवेळी दिलीप देशमुखांचे समर्थक त्र्यंबक भिसे यांना संधी देण्यात आली होती. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनसंपर्क धीरज देशमुख यांनी वाढवला आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आता लातूर शहरातून अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख आपले नशीब आजमावणार असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष लातुरकडे असणार आहे. औसा मतदार संघातून बसवराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. धीरज देशमुख यांचे नाव जाहीर होताच शहरात फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आले.

Intro:विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुखही विधानसभेच्या आखाड्यात ; अमित देशमुख, बसवराज पाटील यांच्या नावालाही मोहर
लातूर : जिल्ह्यातील औसा आणि लातूर शहरासाठीच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होते. त्यानुसार लातूर शहरासाठी आ. अमित देशमुख आणि आ. बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाला आहे. लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसने चेहरा बदलला असून स्व. विलासराव देशमुख यांचे कनिष्ठ चिरंजीव धीरज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. Body:लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे उमेदावरीच्या रांगेतून बाहेर झाले असून जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यंदा प्रथमच विधानसभेसाठी निवडणूक लढिवणार आहेत. घराणेशाहीला विरोध म्हणून कि काही धीरज देशमुख यांच्या नावाचा उल्लेख होतो कि नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते जि.प. सदस्य या कालावधीतच धीरज देशमुख यांनी लातूर ग्रामीणमध्ये तयारी सुरु केली होती. ग्रामीण भागातील मांजरा, रेणा आणि विकास या तिन्हीही कारखान्याचा समावेश या मतदारसंघात आहे. त्यामुळे सहकारातून क्षेत्रातून देशमुखांची पक्कड ग्रामीण भागात आजही आहे. गतवेळी दिलीपराव यांचे समर्थक त्र्यंबक भिसे यांना हि संधी मिळाली होती. मात्र, गेल्या तीन वर्षापसून कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनसंपर्कावर धीरज देशमुख यांनी भर दिला होता. शिवाय उमेदवारी जाहीर होण्याअगोदर प्रत्यक्ष प्रचारालाही सुरवात केली होती. आता लातूर शहरातून अमित देशमुख तर ग्रामीणमधून धीरज देशमुख नशीब आजमिवणार आहेत तर औसा मतदार संघातून आ. बसवराज पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. Conclusion:धीरज देशमुख यांचे नाव जाहीर होताच शहरात तसेच ग्रामीण भागात फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.