ETV Bharat / state

लढा दुर्धर कन्सरशी - 'कल्पना' शक्तीच्या पलीकडची ' फिनिक्स भरारी'

जिद्द आणि लढाई यथार्थ या दोन्ही कौशल्यावर आपला शिक्षकीपेशा सांभाळत कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या कल्पना श्यामराव भट्टड यांची ही 'कल्पने'पलीकडची कथा ही फिनिक्स पक्षाच्या भरारीप्रमाणे आहे.

कल्पना श्यामराव भट्टड
author img

By

Published : Mar 8, 2019, 3:18 PM IST

लातूर - कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाबाबत 'आज फिर जिने की तमन्ना है' या नाटिकेतून लोकांचे प्रबोधन करणाऱ्या शिक्षिकेलाच कॅन्सरचे निदान झाले. जिद्द आणि लढाई यथार्थ या दोन्ही कौशल्यावर आपला शिक्षकीपेशा सांभाळत कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या कल्पना श्यामराव भट्टड यांची ही 'कल्पने'पलीकडची कथा ही फिनिक्स पक्षाच्या भरारीप्रमाणे आहे. ज्या नाटिकेतून प्रबोधन करत त्याचा वास्तवाशी मेळ घालून त्या पुन्हा प्रबोधनाचा वसा घेण्यास तयार झाल्या आहेत.

कल्पना श्यामराव भट्टड

कल्पना भट्टड ह्या शिक्षकीपेशा सांभाळत बहिणाबाई वाचक मंचाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. यामधीलच एक भाग म्हणून त्यांनी ' फिर जिने की एक तमन्ना' या नाटिकेतून कॅन्सर रोगाबाबत प्रबोधनाचे काम केले आहे. आतापर्यंत या नाटकाचे १० यशस्वी प्रयोग पार पडले आहेत. मात्र, नियतीने कल्पना यांच्या बाबतीत असा खेळ खेळला की ज्या नाटकाच्या माध्यमातून कॅन्सरबाबत प्रोबोधन केले जात होते, तोच आजार त्यांना झाला. त्यांना स्तनाच्या कॅन्सरचे निदान झाले. जणू काही नाटिकेत केलेला प्रयोग आता प्रत्यक्षात करून दाखव असेच नियतीला म्हणायचे होते की काय? मात्र अशा परिस्थितीमध्येही न डगमगता जिद्द आणि लढाईचे यथार्थ दाखवले आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्याने गतवर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तब्बल ६ महिने केमोथेरपीचे आणि रेडिओथेरपीचे उपचार झाले. केमोथेरपीमुळे त्यांनी डोक्यावरील केसही गमावले गमावले. स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि कुटुंबियांचे पाठबळ याच्या जोरावर त्यांनी एम. ए. मराठी द्वितीय वर्षाच्या परीक्षा दिल्या आहेत. एक वर्षाच्या लढ्यानंतर कल्पना भट्टड ह्या कॅन्सर आजारातून मुक्त झाल्या आहेत. या दुर्धर आजाराचा सामना केल्यानंतर पुन्हा या रोगाबाबत प्रबोधन करण्याचा मानस त्यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केला आहे.

आता त्या अध्यापणाबरोबरच कॅन्सर उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी या विषयी अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत. कुटूंबातील प्रत्येकाची साथ आणि डॉ. ज्योसना कुकडे, डॉ. अजय पुनपाळे यांनी दिलेला आत्मविश्वासच कामी आल्याचे त्यांनी सांगितले. आता पुन्हा 'फिर जिने की तमन्ना' या नाटिकेच्या ८ व्या प्रयोगासाठी कल्पना सज्ज झाल्या आहेत.

महिलांनी आपला आजार न लपविता मैत्रिणी किंवा डॉक्टरांशी बोलून दाखवणे गरजेचे आहे. आजारपणामुळे नैराश्य येणाऱ्या अनेक जणांना कल्पना भट्टड यांचा प्रेरणादायी प्रवास बळ देणारा आहे.

Intro:'कल्पना' शक्तीच्या पलीकडची ' फिनिक्स भरारी'
लातूर : कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाबाबत 'फिर जिने की तमन्ना' या नाटिकेतून लोकांचे प्रबोधन करणाऱ्या शिक्षिकेलाच कॅन्सरचे निदान झाले. जिद्द आणि लढाई यथार्थ या दोन्ही कौशल्यावर आपला शिक्षकीपेशा सांभाळत कॅन्सरशी दोन हात करणाऱ्या कल्पना श्यामराव भट्टड यांची ही 'कल्पने'पलीकडची कथा ही फिनिक्स भरारीप्रमाणे आहे. ज्या नाटिकेतून प्रबोधन करत त्याचा वास्तवाशी मेळ घालून त्या पुन्हा प्रबोधनाचा वसा घेण्यास तयार झाल्या आहेत.

Body:कल्पना भट्टड ह्या शिक्षकीपेशा सांभाळत बहिणाबाई वाचक मंचाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत. यामधीलच एक भाग म्हणून त्यांनी ' फिर जिने की एक तमन्ना' या नाटिकेतून कॅन्सर रोगाबाबत प्रबोधनाचे काम केले आहे. आतापर्यंत या नाटकाचे 7 यशस्वी प्रोयोग पार पडले आहेत. मात्र, नियतीने कल्पना यांच्या बाबतीत असा खेळ खेळला की ज्या नाटकाच्या माध्यमातून कॅन्सरबाबत प्रोबोधन केले जात होते तोच आजार त्यांना स्तनाच्या कॅन्सर रूपाने जडला. जणू काही नाटिकेत केलेला प्रयोग आता प्रत्यक्षात करून दाखव असेच नियतीला म्हणायचे होते की काय? मात्र अशा परिस्थितीमध्येही न डगमगता जिद्द आणि लढाईचे यथार्थ दाखवले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने गतवर्षी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तब्बल 6 महिने किमोथेरपीचे उपचार. यानंतर रेडिओथेरपीचे उपचार. जानेवारी 2018 ते जानेवारी 2019 हे वर्ष केवळ शस्त्रक्रिया आणि उपचारामध्ये जात असताना विविध क्रियांच्या माऱ्यामुळे सौंदर्याचे वैभव म्हणून ओळखले जाणारे डोक्यावरील केसही कल्पना गमवावे लागले होते. स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि कुटुंबियांचे पाठबळ या बळावर त्यांनी अशा स्थितीमध्ये एम. ए. मराठी द्वितीय वर्षाच्या परीक्षा दिल्या आहेत. एक वर्षाच्या लढ्यानंतर कल्पना भट्टड ह्या कॅन्सर आजारातून मुक्त झाल्या आहेत. या दुर्धर आजाराचा सामना केल्यानंतर पुन्हा या रोगाबाबत प्रबोधन करण्याचा मानस त्यांनी ईटीव्ही भारताशी बोलताना व्यक्त केला आहे. सध्या अध्यापणाबरोबरच कॅन्सर उपचारादरम्यान घ्यावयाची काळजी या विषयी त्या अनेकींना मार्गदर्शन करीत आहेत. कुटूंबातील प्रत्येकाची साथ आणि डॉ. ज्योसना कुकडे, डॉ. अजय पुनपाळे यांनी दिलेला आत्मविश्वासच कामी आल्याचे त्यांनी सांगितले. आता पुन्हा 'फिर जिने की तमन्ना' या नाटिकेच्या 8 प्रयोगासाठी कल्पना श्याम भट्टड या सज्ज झाल्या आहेत.

Conclusion:महिलांनी आपले आजार न लपविता मैत्रिणी किंवा डॉक्टरांशी बोलून दाखवणे गरजेचे आहे. जीवन जगण्याची तमन्ना वाढविण्यासाठी कल्पना भट्टड यांचे उदाहरण अनेक महिलांना उपयोगी पडणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.