ETV Bharat / state

जलसंधारणामध्येही 'लातूर पॅटर्न' ; केंद्रसरकारचे दोन पुरस्कार लातूर जिल्ह्याला

author img

By

Published : Feb 20, 2019, 5:54 PM IST

'नदी जलसंधारण' श्रेणीतील प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना, द्वितीय पुरस्कार जाऊ येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेला जाहीर

1

लातूर - जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत असल्या तरी गतवर्षी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. याची दखल घेत केंद्र सरकारने 'नदी जलसंधारण' श्रेणीतील प्रथम पुरस्कार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना जाहीर केला आहे. तर दुसरा पुरस्कार हा जलसंधारणाचा अनोखा उपक्रम राबविणाऱ्या जाऊ येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेला जाहीर केला आहे.

केंद्र सरकारच्या जलसंधारण विभागाच्यावतीने दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. गतवर्षी जिल्ह्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली असून पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही जिल्ह्यात केवळ दोन टँकरने सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले तसेच गेल्या दोन वर्षात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मागदर्शनाखाली जलसंधारणाची कामे झाली आहेत.

लातूर जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. जलसंधारण तसेच नदी विकासाची कामे दरम्यानच्या कालावधीत करण्यात आली आहेत. दुष्काळात मांजरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्याचाही लाभ झाला आहे. जलसंधारण अधिक प्रमाणात व्हावे यासाठी निलंगा तालुक्यातील जाऊच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेने अनोखे उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली होती. त्यामुळे या शाळेसही सर्वोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
ही जलसंधारणाची कामे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. अरावत, उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मुख्याध्यापक दत्तात्रय मुखाम यांच्यासह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेऊन जलसंधारणाचे कामे केली आहेत. याच कामाची पावती म्हणून हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे. दिल्लीत २५ फेब्रुवारी येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

undefined

एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या होरपळून निघत आहे. त्याचबरोबर या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जलसंधारणची कामे करण्यातही आघाडीवर आहे. त्यामुळे जलसंधारणासाठी दिला जाणारा पुस्कार लातुरकरांना प्रेरणादायी ठरणार आहे.

Intro:जलसंधारणामध्येही 'लातूर पॅटर्न' ; केंद्रसरकारचे दोन पुरस्कार लातूर जिल्ह्याला
लातूर - सध्या दुष्काळाच्या झळा जिल्ह्याला बसत असल्या तरी गतवर्षी जलसंधारणाची कामे मोठ्या
प्रमाणात झाली आहेत. याची दखल केंद्र सरकारनेही घेतली असल्याने नदी जलसंधारण श्रेणीतील प्रथम पुरस्कार जिल्हाअधिकारी जी. श्रीकांत यांना तर जलसंधारणाचा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल जाऊ येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेला जाहीर झाला आहे. २५ फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.Body:केंद्र सरकारच्या जलसंसाधन विभागाच्यावतीने दरवर्षी या पुरस्काराचे वितरण केले जाते. गतवर्षी जिल्ह्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली असून पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे. मात्र, सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाल्याने आवर्षनाची स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही जिल्ह्यात केवळ दोन टँकरने सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले तसेच गेल्या दोन वर्षात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वामध्ये जलसंधारणाची कामे झाली आहेत. लातूर जिल्ह्याला हा पुरस्कार प्रदान होण्याची ही पहिलीच वेळ असून जलसंधारण तसेच नदी विकासाची कामे दरम्यानच्या कालावधीत करण्यात आली आहेत. दुष्काळात मांजरा नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्याचा लाभ झाला आहे. जलसंधारण अधिक प्रमाणात व्हावे यासाठी निलंगा तालुक्यातील जाऊच्या मुलींच्या शासकीय निवासी शाळेने अनोखे उपक्रम राबवून जलसंधारणाची कामे केली होती. त्यामुळे या शाळेसही सर्वोत्तम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ही जलसंधारणाची कामे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरावत, उपायुक्त दिलीपकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दत्तात्रय मुखाम यांच्यासह विद्यार्थ्यांनी परीश्रम घेऊन केली होती. या सबंध कामाची पावती म्हणून हा पुरस्कार जिल्ह्याला मिळाला आहे. Conclusion:सोमवारी हा पुरस्कार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह जाऊ येथील मुलींच्या शासकीय निवासी शाळेला मिळणार असून लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.