लातूर - शहराचे अर्थकारण ज्या क्लासेसवर अवलंबून आहे, त्या खासगी क्लास असणाऱ्या परिसरातील तीन खासगी क्लासेसवर आज( बुधवार) दिवस उजाडताच छापा टाकला. ही कागदपत्रांची नियमित तपासणी असल्याचे सांगण्यात येत असले तरी या परिसरात कमालीची शांतता पाहावयास मिळाली.
शहरातील क्लासेस परिसर नेहमी विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. बुधवारी सकाळी एकाच वेळी नामांकित अशा क्लासेवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. नेमक्या कोणत्या कारणास्तव हा छापा टाकण्यात आला हे स्पष्ट झाले नसले तरी ही नियमित तपासणी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनावर याचा परिणाम होऊ नये म्हणून क्लासेसला सुट्टी देण्यात आली होती.
हेही वाचा - कामाच्या शोधात गेला अन् नागासाधू होऊन आला; तेही फक्त १० दिवसांसाठी
यापूर्वी शहरातील खासगी रुग्णालयावर धाड टाकण्यात आली होती. मात्र, आता शहराच्या अर्थकारणाचे मुख्य असलेल्या क्लासेसवरच धाड टाकण्यात आली आहे. लातूर शहरात केवळ जिल्ह्यातूनच नाहीत तर संबंध राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी दाखल होतात. यामागचे अर्थकारण मोठे असल्याने या क्लासेस चालकांचे व्यवहार योग्य आहेत की नाही याची ही तपासणी असल्याचे सांगितले जाते. औरंगाबाद येथील अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे.
हेही वाचा - अखेर 'तो' बरसला; लातूरकरांना दिलासा