ETV Bharat / state

बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या - लातूर ताजी बातमी

विठ्ठल दारू पिऊन पत्नीलासोबत चल म्हणून जबरदस्ती करीत होता. त्यामुळे सासऱ्याने 'तू आमच्या घराबाहेर जा' असे सुनावले. याचा राग मनात धरून दारूच्या नशेत विठ्ठलने गावाजवळील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

लातुरात बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या
author img

By

Published : Nov 4, 2019, 6:49 PM IST

लातूर - जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात विठ्ठल शंकर धुळगुंडे (वय २५) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बायको माहेरी येत नसल्याच्या कारणाने झालेल्या वादात हे कृत्य विठ्ठलने केल्याचे उघड झाले आहे.

लातुरात बायको माहेरी येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

हेही वाचा- शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर

काय आहे नेमके प्रकरण-

विठ्ठल धुळगुंडे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील माळेगावचा रहिवासी आहे. तो काही दिवसांपासून मरसंगवी गावात त्याच्या सासरवाडी राहत होता. तो बायकोला घरी घेऊन नेण्यासाठी सासरवाडीत आला होता. विठ्ठल दारूच्या आहारी गेल्याने त्याची पत्नी त्याला कंटाळून बऱ्याच दिवसांपासून माहेरी वडिलांकडे राहत होती. विठ्ठल बायकोला सोबत नेण्यासाठी दररोज विनवीत होता. मात्र, विठ्ठल दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करत असल्याने पत्नी विठ्ठलसोबत जाण्यास राजी होत नव्हती. त्यामुळे तो तेथेच बायको सोबत राहत होता.

दरम्यान, विठ्ठल दारू पिऊन पत्नीलासोबत चल म्हणून जबरदस्ती करीत होता. त्यामुळे सासऱ्याने 'तू आमच्या घराबाहेर जा' असे सुनावले. याचा राग मनात धरून दारूच्या नशेत विठ्ठलने गावाजवळील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात १७४ सीआरपीसी प्रमाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय बोइनवाड करीत आहेत.

Intro:सासरवाडीत जावायाची गळफास घेऊन आत्महत्या .

बायको माहेरी आल्याने जावाई विठ्ठल शंकर धुळगुंडे हे चार दिवसांपासून सासुरवाडीतच राहून बायकोला सोबत सासरी येण्यासाठी विनंती करीत होता. मात्र विठ्ठल हा दारूच्या आहारी गेल्याने सासुरवाडीच्या मंडळीने आपल्या मुलीला विठ्ठल सोबत पाठवण्यास नकार दिला. एवढाच राग मनात धरून दारूच्या नशेत विठ्ठलने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Body:

लातूर:-च्या जळकोट तालुक्यातील मरसांगवी गावात विठ्ठल शंकर धुळगुंडे वय २५,या तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
विठ्ठल धुळगुंडे हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील माळेगाव चा रहिवाशी आहे. तो काही दिवसांपासून मरसंगवी गावात त्याच्या सासुरवाडी रहात होता. तो बायकोला बोलावून नेण्यासाठी आला होता, विठ्ठल हा दारूच्या आहारी गेल्याने त्याची पत्नी त्याला कंटाळून बऱ्याच दिवसापासून माहेरी वडीलाकडे राहत होती. तो बायकोला सोबत नेण्यासाठी दररोज विनवीत होता. मात्र विठ्ठल दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करत असल्याने पत्नी विठ्ठल सोबत जाण्यास राजी होत नव्हती.त्यामुळे तो तेथेच बायको सोबत राहुलगला अचानक रात्री विठ्ठल दारूपिऊन आपल्या पत्नीला माझ्या सोबत आत्ताच चल म्हणून जोर जब्बारदस्थि करीत असल्याने सासऱ्याने तूच आमचे घर व आमचे गावं सोडून जा असे म्हणाले. दारूच्या नशेत टूल असलेला विठ्ठल धुळगुंडे राग- रागाने सासरवाडीच्या घरातून बाहेर पडला. सकाळी मरसंगवी गावच्या जवळच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन लटकत असलेल्या अवस्थेत आढळला.
या घटनेची माहिती जळकोट पोलिस ठाण्यात कळताच घटनास्थळी पोलिस दाखल होत प्रेतास ताब्यात घेऊन सवच्छेदनासाठी प्रेत जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले .मृताचे भावाने जळकोट पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून
जळकोट पोलीस ठाण्यात १७४ सीआरपीसी प्रमाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास API बोइनवाड हे करीत आहेत.

Conclusion:

सासरवाडीत राहणाऱ्या जावायाने दारूच्या नशेत गळफास लावून आपल्या जीवनाचा प्रवास स्वतः संपवून घेतला. मात्र त्याचा एवढा त्रास सहन करून त्याचा संसाराचा गाडा हकणाऱ्या महिलेचा जगण्याचा प्रवास मात्र खडतर करून गेला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.