ETV Bharat / state

लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात चार मजली इमारतीला भीषण आग - लातूर शहरातील इमारतीला लागली आग

लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील चार मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वेल्डिंगच्या काममुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

huge fire broke out in a four-storey building in Latur city
लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात चार मजली इमारतीला भीषण आग
author img

By

Published : Jan 29, 2021, 8:46 PM IST

Updated : Jan 29, 2021, 9:36 PM IST

लातूर - गंजगोलाई ही शहरातील मुख्य बाजारपेठ आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 च्या दरम्यान येथील गोयल एंटरप्राइजेसच्या चार मजली इमारतीला आग लागली. वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तीवला जात आहे.

लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात चार मजली इमारतीला भीषण आग

शहराच्या मध्यवर्ती ठिकणी गंजगोलाईची बाजारपेठ आहे. येथील गोयल एंटरप्राइजेसच्या इमारतीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. सायंकाळी 6 च्या दरम्यान या इमारतीमधून आगीचे लोट बाहेर पडू लागले. इमारतीमध्ये ऑईलपेंट असल्याने या आगीने चार मजली इमारत कव्यात घेतली. आग विझवण्यासाठी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. असे असतानाही आग आटोक्यात येत नसल्याने औसा, उस्मानाबाद, बीड या ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या मागवून घेण्यात आल्या आहेत. रात्री 7 पर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केले आहे. गंजगोलाईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे, तर जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा भाग खूपच चिंचोळा असल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मनपाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. असे असले तरी आग आटोक्यात येईल अशी स्थिती सध्या तरी नाही.

विद्युत पुरवठाही खंडित -

शहराच्या मध्यवर्ती ठीकाणी ही घटना घडली आहे. सायंकाळी या परिसरात मोठी वर्दळ असते. त्यामुळे गोलाईच्या सर्व 16 मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय आग पसरू नये म्हणून या भागातील विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.

Last Updated : Jan 29, 2021, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.