ETV Bharat / state

कुपोषणाविषयी जागरूकतेसाठी बालविकास सेवा योजनेच्या वतीने 'पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शना'चे आयोजन - malnutrition

जळकोट शहरात श्री गुरुदत्त सप्ताह सोहळ्यानिमित्त पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात 'पोषण सकस आहार'च्या बाबतीत माहिती देण्यात आली.

Healthy Diet exhibition
पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:00 PM IST

लातूर - ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याने बाळांच्या आईलाच पोषण व सकस आहाराची गरज आहे. याकरता एकात्मिक बालविकास सेवा योजना पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन घेण्यात आले.

Healthy Diet exhibition
पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन

जळकोट शहरात श्री गुरुदत्त सप्ताह सोहळ्यानिमित्त पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनात जळकोट तालुक्यातील ३ विभागाच्या ११६ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवून आणलेल्या पोषण व सकस आहाराच्या २०० थाळ्या ठेवण्यात आल्या आहेत.

पोषण सकस आहाराविषयी माहिती देताना अंगणवाडी पर्यवेक्षिका

प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या थाळ्यांची तज्ज्ञांकडून पाहणी करण्यात आली. यात वांजरवडा विभागाच्या थाळ्यांची पहिला क्रमांकावर निवड झाली आहे. तर, जळकोट विभागाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. अंगणवाडी सुपरवायझर आशा नादरगे म्हणाल्या ० ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना असा आहार देणे खूप गरजेचे आहे. असा सकस आहार प्रत्येक गर्भवती महिलेने घरच्या घरी बनवून वेळेवर घेतल्यास जन्माला येणारे बाळ निरोगी, सुदृढ व कुपोषण मुक्त होईल. त्यामुळे असे प्रदर्शन घेऊन ग्रामीण भागातील महिलांना जागरूक करण्याची गरज असून यासाठी हे प्रदर्शन घेण्यात आले आहे असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा - उदगीर अत्याचार प्रकरण : पीडितेला आरोपीच्या नातेवाईकांकडून धमक्या; पतीलाही सहआरोपी करण्याची मागणी

या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या थाळ्या पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो महिलांनी या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या 'पोषण सकस आहार'च्या बाबतीत माहिती करून घेतली.

हेही वाचा - भाजीपाल्याच्या दराचे वास्तव; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल

Intro:ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याने बळांच्या आईलाच पोषण व सकस आहाराची गरज आहे.म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजना पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन घेण्यात आले आहे.

Body:

लातूर:-जळकोट शहरात श्री गुरुदत्त सप्तह सोहळ्या निमित्त पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या वतीने पोषण आहार व आकार साहित्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे.या प्रदर्शनात जळकोट तालुक्यातील तिन विभागाच्या116,अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बनवून आणलेल्या पोषण व सकस आहाराच्या 200,थाळ्या या पदर्शनात ठेवण्यात आले आहेत.
प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या थळ्यांची तज्ञांकडून पहाणी करण्यात आली असून यात वांजरवडा विभागाच्या थळ्यांची पहिला क्रमांक म्हणून निवड झाली आहे. तर जळकोट विभागाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. अंगणवाडी सुपरवायझर आशा नादरगे म्हणाल्या झिरो ते सहा वर्षा परेंतिच्या मुलांना असा आहार देने खूप गरजेचे आहे. असा आहार प्रत्येक गर्भवती महिलेने घरच्या घरी बनवून वेळेवर घेतल्यास जन्माला येणारे बाळ निरोगी व सुदृढ व कुपोषन मुक्त होईल.त्यामुळे असे प्रदर्शन घेऊन ग्रामीण भागातील महिलांना जागरूक करण्याची गरज आहे. यासाठी असे प्रदर्शन घेण्यात आले आहे.Conclusion:

या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या थाळ्या पहाण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली असून शेकडो महिलांनी या पदरदर्शनात मांडण्यात आलेल्या पोषण सकस आहार याच्या बाबतीत माहितीही करून घेतली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.