ETV Bharat / state

'हॅप्पी इंडियन व्हिलेज'चा उपक्रम : एचआयव्हीबाधित अनाथ मुले आत्मनिर्भर, सेवालयात फुलली शेती

author img

By

Published : Nov 13, 2020, 5:25 PM IST

Updated : Nov 13, 2020, 5:40 PM IST

कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. तसाच तो सेवालयाला मिळणाऱ्या मदत निधीवरही झाला. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत रवी बापटले यांचे अभिनव उपक्रम आणि सेवालयतील 84 मुलांची त्यांना मिळालेली साथ ही अधोरेखीत करण्यासारखी आहे. त्याअनुषंगाने 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट...

हॅप्पी इंडियन व्हिलेज
हॅप्पी इंडियन व्हिलेज

लातूर - गेल्या आठ महिन्यात एक वाक्य सर्रास ऐकायला मिळते. ते म्हणजे, 'कोरोनामुळे जगणं मुश्किल झालंय'. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करायचा, हे एड्सग्रस्त मुलांनी दाखवून दिले आहे. ही अतिशयोक्ती वाटत असली तरी वास्तव आहे. लातूर जिल्ह्यातील हासेगाव येथे 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' नावाचे सेवालय आहे. कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. तसाच तो सेवालयाला मिळणाऱ्या मदत निधीवरही झाला. गेल्या 13 वर्षाच्या कालावधीत कधी एवढी टंचाई भासली नाही, ती कोरोनाच्या काळात भासली. सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांना जाणवली. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत रवी बापटले यांचे अभिनव उपक्रम आणि सेवालयातील 84 मुलांची त्यांना मिळालेली साथ ही अधोरेखीत करण्यासारखी आहे.

एचआयव्ही बाधित अनाथ मुले आत्मनिर्भर

लातूर शहरापासून अवघ्या 12 किमी अंतरावर 14 एकरात एड्स बाधित मुलांच्या संगोपनासाठी 'हॅप्पी इंडियन व्हिलेज' उभारण्यात आले आहे. सेवालयाच्या स्थापनेचा काळ तसा खडतर होता. समाजातून होत असलेला विरोध, नागरिकांची तिरस्काराची भावना या सर्व गोष्टींचा सामना करीत रवी बापटले यांनी एका मुलाला घेऊन सुरू केलेल्या सेवालयात आता 84 मुलं-मुली आहेत. काळाच्या ओघात समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आणि सेवालयाचे उद्देश समाजासमोर उभा राहिला. यातून मदतीचे हात पुढे येऊ लागले. उभारणीच्या काळातील संघर्षापेक्षा कठीण काळ होता तो कोरोनाचा. ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनेकांनी आखडते हात घेतले. तर दुसरीकडे मुलांची संख्याही मोठी होती. जिथे माणूस फिरकायला तयार नाही तिथे मदत कोठून मिळणार, अशी स्थिती निर्माण झाली होती. याच परिस्थितीचे सोने सेवालयातील मुलांनी रवी बापटले यांच्या मदतीने केले.

हॅप्पी इंडियन व्हिलेज
हॅप्पी इंडियन व्हिलेज

कोरोना काळात मास्कची विक्री -

सेवालयातील मुलांच्या संगोपनासाठी दिवसाकाठीचा पाच हजार रुपयांचा खर्च आहे. अशा परिस्थितीमध्ये सेवालायतील मुलांनी पाहिले काम हाती घेतले ते मास्क बनविण्याचे. दरम्यानच्या काळात या मुलांनी 35 हजार मास्क बनविले. त्यातून त्यांच्या पदरी 1 लाख रुपये पडले.

डोंगराळ भागात फुलवली शेती -

हॅप्पी इंडियन व्हिलेज
हॅप्पी इंडियन व्हिलेज

एवढ्यावरच न थांबता या सहा महिन्यांच्या कालावधीत सेवालयच्या 14 एकर परिसरातील डोंगराळ भागात मुलांनी शेती फुलवली. यामध्ये भाजीपाला लागवड, कुकुटपालन, जनावरे एवढेच नाही तर शेततळे उभारून डाळींब बागेचीही लागवड केली आहे. त्यामुळे रोज लागणाऱ्या भाजीपाल्याचा प्रश्न मिटला. शिवाय दूधही उपलब्ध झाले. तसेच मास्कच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून इतर गरजा पुरवल्या गेल्या. सेवालायतील 84 मुलांचे वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आले होते. आपलाच ग्रुप कामात सरस कसा हे दाखवून देण्यासाठी प्रत्येकजण कष्ट करीत होता. आजही सेवालयच्या प्रवेशद्वारापासून ते किचनपर्यंत मुलांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी शिस्त तर आहेच. परंतु प्रत्यक्षात काम करायचे कसे याचा अनुभव प्रत्येक मुलाला मिळाला आहे.

चार एकरात फुलली बाग -

कधी काळी डोंगराळ आणि कोरडवाहू असलेला 14 एकरचा परिसर आता हिरवागार झाला आहे. एवढेच नाही तर यातील 4 एकरमध्ये फळबाग लागवड करण्यात आली आहे. यामध्ये डाळींब, सीताफळ, आंबा यासारख्या बागा आहेत. ठिंबकद्वारे या बागांची जोपासना केली जात आहे. सेवालयात सर्व काही नियोजनबद्ध असून या विविध उपक्रमांतून प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले असून मूलभूत सुविधांबाबत सेवालय आत्मनिर्भर झाले आहे.

हॅप्पी इंडियन व्हिलेज
हॅप्पी इंडियन व्हिलेज

संगोपनच नाही तर संसारही थाटले -

एचआयव्ही बाधित मुलांचे संगोपन व्हावे यादृष्टीने 13 वर्षांपूर्वी या सेवालयची स्थापना केली होती. गेल्या 11 वर्षात एकाही मुलाचा या दुर्धर आजाराने मृत्यू झालेला नाही, हे विशेष. शिवाय मुलांचे आयुर्मान वाढत असल्याने सेवालयातील मुला- मुलींचे विवाह थाटात पार पडले आहेत. त्यामुळे सेवालयात मुलांचे संगोपन तर झालेच, शिवाय चार जोडप्यांचे या ठिकाणी संसारही थाटलेले आहेत. सेवालयातील परिसरात काम करून हे कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत.

1 कोटी 56 लाख लिटरचे शेततळे उभारले -

सेवालयातील 14 एकरात वेगवेगळी पिके घेतली जात आहेत. भाजीपाला, जनावरांना चारा घेण्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासत होती. यावर पर्याय म्हणून सेवालयच्या परिसरात तब्बल 1 कोटी 56 लाख लिटरचे शेततळे उभारण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला असून सेवालयच्या वैभवात भर पडली आहे.

26 जानेवारीपासून वृद्धाश्रमही उभारले जाणार -

बेघर किंवा रस्त्यावर भीक मागून जीवन जगत असलेल्या निराधारांसाठी आता सेवालय पुढाकार घेणार आहे. लातूर शहरात बेघर असलेल्या नागरिकांसाठी घर उभारणीचा प्रस्ताव केवळ कागदावर आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला रात्र काढण्याची नामुष्की अनेकांवर ओढवली आहे. या बाबींचा विचार करून आता सेवालयात वृद्धाश्रम उभारले जाणार आहे. 26 जानेवारीपासून याची सुरवात केली जाणार असल्याचे सेवालयाचे संस्थापक रवी बापटले यांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 13, 2020, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.