ETV Bharat / state

Mahavitaran Bribe : बावीस हजाराची लाच घेताना महावितरणच्या असिस्टंट इंजिनिअरला अटक

लातूरमध्ये महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने 22 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. गोविंद तुकाराम सर्जे (वय ४६ वर्षे) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. सोलर बसविण्याच्या कामासाठी त्यांनी 22 हजारांची लाच मागितली होती.

Mahavitaran Bribe
Mahavitaran Bribe
author img

By

Published : Mar 15, 2023, 9:39 PM IST

लातूर : सोलार इंस्टॉलेशनच्या प्रकल्पासाठी तांत्रिक योग्यता (टेक्निकल फिजीबिलीटी) देण्यासाठी बावीस हजाराची लाच घेताना लातूरातील महावितरणच्या सहायक अभियंत्याला ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. असून गोविंद तुकाराम सर्जे (वय 46 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी सोलार इंस्टॉलेशनच्या कामासाठी 22 हजारांची लाच मागीतली होती.

ॲन्टी करप्शन विभागाकडे तक्रार : लातूरातील एकाचा सोलार इंस्टॉलेशनचा व्यावसाय असून त्यांनी हाती घेतलेल्या ग्राहकाच्या प्रोजेक्टकरिता टेक्निकल फिजीबिलीटी (तांत्रिक योग्यता) देण्यासाठी लातूरातील महावितरण कंपनीकडे अर्ज केला होता. लातूरातील महावितरणच्या शाखा क्र.05 चे सहायक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) गोविंद सर्जे यांनी कामासाठी व्यवसायिकास तीस हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ती रक्कम बावीस हजार देण्याचे ठरले होते. परंतू सदरील व्यवसायिकास लाच द्यायची नसल्याने त्याने ॲन्टी करप्शन विभागाकडे रितसर तक्रार दिली.

रंगेहात पकडले : तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ॲन्टी करप्शन विभागाच्या पथाकाने सापळा लावला. लाचेची मागणी केलेली रक्कम घेवून तो व्यवसायिक लोकसेवक यांना त्यांच्या महावितरणच्या कार्यालयात जावून भेटले. असिस्टंट इंजिनिअर गोविंद सर्जे यांनी मागितलेली लाचेची बावीस हजाराची रुपयाची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्विकारली. त्याच वेळी सापळा लावलेल्या ॲन्टी करप्शनच्या पथकाने आरोपी गोविंद सर्जे यांना अटक केली. लातूरच्या ॲन्टी करप्शन विभागाचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजितवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

गोविंद तुकाराम सर्जे यांच्यावर गुन्हा दाखल : सदरील प्रकरणी लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात महावितरणचे असिस्टंट इंजिनिअर गोविंद तुकाराम सर्जे (वर्ग -2) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई लातूरच्या ॲन्टी करप्शन विभागाचे पोलीस उपाधिक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्यासह ॲन्टी करप्शनच्या पथकाने केली आहे. शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या खाजगी इसम (एजेंट) मार्फत कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

हेही वाचा - Pune Crime News : आयटी इंजिनिअरने केली पत्नी, मुलाची हत्या, नंतर घेतला गळफास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.