ETV Bharat / state

दुष्काळप्रश्नी औसा शहरात महिन्यात दोनदा बंद; ७ दिवसांपासून छावा संघटनेचे आमरण उपोषण

लातुरात पाणीप्रश्न भीषण झाला असून मागील ७ दिवसांपासून शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. तसेच दुष्काळप्रश्नी औसा शहरात महिन्यात दोनदा बंद पाळण्यात आला आहे. तरीदेखील प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.

आमरण उपोषण
author img

By

Published : Aug 22, 2019, 9:05 PM IST

लातूर - भर पावसाळ्यात लातूरकर दुष्काळी झळांचा सामना करीत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील औसेकरांनी पाणीप्रश्नाला घेऊन शहर बंद ठेवले होते. तर आज गुरुवारी शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन छावा संघटनेच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत बंदची हाक देण्यात आली आहे.

दुष्काळप्रश्नी औसा शहरात बंद
जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, खरिपाची नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50 हजाराची मदत करावी यासारख्या विविध मागण्या घेऊन गेल्या 7 दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज गुरवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर उद्या शुक्रवारी मराठवाडा बंदची हाक देण्यात आली आहे. यापूर्वी महिन्याच्या सुरुवातीला शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने शहर बंद ठेवण्यात आले होते.
भर पावसाळ्यात औसेकरांनी पाणी विकत घ्यावे लागत आहे. दरम्यान, माकणी धारणावरून नियोजित असलेली पाईपलाईन अनेक वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटला असून नागरिक त्रस्त आहेत. दुष्काळी प्रश्नांबाबत आतापर्यंत शहर दोन वेळेस बंद ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Intro:बाईट : जनार्धन विधाते ( उपविभागीय अधिकारी, औसा)

दुष्काळप्रश्नी औसा शहर महिन्यातून दोनदा बंद
लातूर : भर पावसाळ्यात लातूरकर दुष्काळी झळांचा सामना करीत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला औसेकरांनी पाणीप्रश्नाला घेऊन शहर बंद ठेवले होते. तर आज शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन छावा संघटनेच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत बंदची हाक देण्यात आली आहे.
Body:लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा, खरिपाची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी 50 हजाराची मदत करावी यासारख्या विविध मागण्या घेऊन गेल्या 7 दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे- पाटील यांनी आमरण उपोषण केले आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर उद्या मराठवाडा बंदची हाक देण्यात आली आहे. यापूर्वी महिन्याच्या सुरवातीला शहराला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने शहर बंद ठेवण्यात आले होते. भर पावसाळ्यात औसेकरांनी विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. माकणी धारणावरून नियोजित असलेली पाईपलाईन अनेक वर्षापासून रखडलेली आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटला असून नागरिक त्रस्त आहेत. Conclusion:दुष्काळी प्रश्नांबाबत आतापर्यंत शहर दोन वेळेस बंद ठेवण्यात आले असतानाही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.