लातूर - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना औसा तालुक्यातील येलोरी शिवारात घडली. विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे गट क्रमांक ३०३ मधील शिवरात आग लागली, वाऱ्यामुळे ही आग पसरत गेली. यामध्ये जनावरांचा चारा तसेच फळझाडे आणि शेती साहित्य जळून खाक झाले आहे.
देविराज मल्लिकार्जुन पाटील यांच्या शेताला आग लागली. यात शिवारात असलेल्या कडब्याच्या पेंड्या शेजारच्या शेतातील फळपिकेही जळून खाक झाली. या आगीत धनराज पाटील आणि गुरूराज पाटील यांच्या शेतातील २९ पाईप, २५० फूट केबल, ८० हस्ती पाईप व ६ हजार कडब्याच्या पेंड्या जळल्या आहेत. सोबतच चंदन, आंबा, लिंबूच्या झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाला असून त्वरीत पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.