ETV Bharat / state

लातुरात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जमाफीनंतरही आत्महत्येचे सत्र सुरूच - नापिकी

शेतीचे आणि बचत गटाचे कर्ज यातच यंदाच्या कर्जमाफीत आपला समावेश होतो की नाही या विवंचनेतून धागवड येथील वैजनाथ भुजबळ या शेतकऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर, दुसरीकडे सरकारने जिल्ह्यात कर्जमाफी जाहीर करुनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याचे चित्र यानिमित्त पुढे आले आहे.

latur
लातुरात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या
author img

By

Published : Jan 5, 2020, 2:07 PM IST

लातूर - लातूर तालुक्यातील गाधवड येथील एका तरुण शेतकऱ्यानी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. वैजनाथ रामलिंग भुजबळ असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

लातुरात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

मांजरा पट्टा आणि शेतीसाठी सुपीक जमीन ही लातूरची भौगोलिक स्थिती असतानाही गेल्या ३ वर्षांपासून हा जिल्हा शेतकरी आत्महत्येने ग्रासला आहे. वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी कर्जाचा वाढता डोंगर, नापिकी अशा शेतीसंबंधीच्या प्रश्नावरून जीवन संपिवले आहे. कर्जमाफीचा तिढा कायम असतानाच २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. कर्जमाफीबद्दलच्या अटी-नियम दिवसागणिक बदलत आहेत. त्यामुळे या निर्णयाबद्दल नेत्यांचे राजकारण होत आहे. मात्र, प्रत्यक्ष आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची अवस्था ही भीषण असून कर्ता पुरुषच गेल्याने आता जगावे कसे असा सवाल या कुटुंबीयापुढे आहे.

गत आठवड्यात लातूर तालुक्यातील गाधवड येथील तरुण शेतकरी वैजनाथ रामलिंग भुजबळ यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली होती. शासकीय बँकेचे आणि बचत गटाचे असे अडीच लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. यातच आई-वडिलांसह मुलाबाळांचा सांभाळ कसा करावा. शिवाय यंदाच्या कर्जमाफीत तरी समावेश होतो कि नाही, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. शेती बरोबरच पेंटिंगची कामे करणाऱ्या वैजनाथने असे कृत्य केल्याने आता जगावे कसे असा सवाल त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. तर दुसरीकडे संपूर्ण कर्जमाफी, कर्जमुक्ती करून दाखवले, यासारखे सरकारचे निर्णय दररोज कानी पडतात. परंतु, शेतकऱ्यांच्या पदरी काय, असा सवाल आजही कायम आहे.

हेही वाचा - लातूर युवा महोत्सव : उद्घाटकाविनाच महोत्सवाचे उद्घाटन...!

दोन मुलं, बायको आणि आई-वडिलांना सोडून वैजनाथ यांनी या वाढत्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हे पाऊल उचलले. कदाचित युती सरकारच्या काळातील कर्जमाफीच्या यादीत त्यांचा समावेश झाला असता तर ही वेळ आली नसती. परंतु, सरकारचे धोरण आणि निसर्गाची अवकृपा यामुळे वैजनाथ सारख्या अनेकांना जग सोडून जावे लागत आहे. यातून वैजनाथ जरी मुक्त झाले असले तरी त्यांच्या दोन्ही मुलांकडे पाहून जीव कासावीस होतो हे नक्की. तर, कर्जमाफीची अंमलबजावणी होते कि नाही हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

हेही वाचा - लातूर : नागरिकत्व कायदा विधेयकाविरोधात उदगीरमध्ये जेलभरो आंदोलन

Intro:बाईट: रामलिंग बुजबळ, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे वडील
2) सोमनाथ बुजबळ, आत्महत्या केल्याचा भाऊ

कर्जमाफीनंतरही लातुरात शेतकरी आत्महत्या; आत्महत्याग्रस्थ कुटुंबाची मन हेलवणारी कहाणी
लातूर : मांजरा पट्टा आणि शेतीसाठी सुपीक जमीन ही लातूरची भौगोलिक स्थिती असतानाही गेल्या ३ वर्षांपासून या जिल्ह्यालाही शेतकरी आत्महत्येने ग्रासलेले आहे. वर्षभरात ९९ शेतकऱ्यांनी कर्जाचा वाढता डोंगर, नापिकी अशा शेतीसंबंधीच्या प्रश्नावरून जीवन संपिवले आहे. कर्जमाफीचा तिढा कायम असतानाच २३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे.
Body:कर्जमाफीबद्दलच्या अटी- नियम दिवसागणीस बदलत आहेत. त्यामुळे या निर्णयाबद्दल राजकीय नेत्यांचे राजकारण होत असले तरी प्रत्यक्ष आत्महत्याग्रस्थ शेतकरी कुटुंबाची अवस्था ही भीषण असून कर्ता पुरुषच गेल्याने आता जगावे कसे असा सवाल या कुटुंबीयासमोर आहे. गतआठवड्यातच लातूर तालुक्यातील गाधवड येथील तरुण शेतकरी वैजिनाथ रामलिंग बुजभळ यांनी वाढत्या कर्जाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली होती. शासकीय बँकेचे आणि बचत गटाचे असे अडीच लाखाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. यातच आई-वडिलांसह मुलाबाळांचा सांभाळ कसा करावा शिवाय यंदाच्या कर्ज माफीत तरी समावेश होतो कि नाही या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. शेती बरोबरच पेंटिंगची कामे करणाऱ्या वैजिनाथने असे कृत्य केल्याने आता जगावे कसे असा सवाल त्यांच्या कुटुंबीयासमोर आहे. तर दुसरीकडे संपूर्ण कर्जमाफी...कर्जमुक्ती...करून दाखवले यासारखे सरकारचे निर्णय रोज कानी पडतात परंतु, शेतकऱ्यांच्या पदरी काय असा सवाल आजही कायम आहे..दोन मुलं, बायको आणि आई-वडिलांना सोडून वैजिनाथ यांनी या वाढत्या कर्जातून मुक्त होण्यासाठी हे पाऊल उचलले. कदाचित युती सरकारच्या काळातील कर्जमाफीच्या त्यांचा समावेश झाला असता तर ही वेळ आली नसती...परंतु सरकारचे धोरण आणि निसर्गाची अवकृपा यामुळे वैजिनाथ सारख्या अनेकांना जग सोडून जावे लागत आहे...यातून वैजिनाथ जरी मुक्त झाले असले तरी त्यांच्या दोन्ही मुलाकडे पाहून जीव कासावीस होतो हे नक्की..Conclusion:असे असूनही कर्जमाफीची अमलबजावणी होती कि नाही हे अनुत्तरितच आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.