ETV Bharat / state

पिकविम्यासाठी शेतकऱ्यांची परवड; उजनी येथे शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन

राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथे शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरू आहे.

author img

By

Published : Feb 8, 2021, 10:07 PM IST

Updated : Feb 8, 2021, 10:33 PM IST

शेतकऱ्यांचे आंदोलन
शेतकऱ्यांचे आंदोलन

लातूर - खरीप २०२० अंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान झालेल्या व विमा कंपनीला विमा हफ्ता भरलेले शेतकरी हे ऑनलाईन अर्ज करू शकलेले नाहीत. यावर पर्याय म्हणून ऑफलाईनचा पर्याय खुला करण्यात आला होता. पण, आता ऑफलाईन अर्ज घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळेच उजनी येथे शेतकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार कृषी विभागाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथे शेतकरी पुत्रांचे आंदोलन सुरू आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन
शेतकऱ्यांचे आंदोलन

हेही वाचा-जालना-नांदेड समृद्धी महामार्ग लागणार मार्गी; सल्लागाराची होणार नियुक्ती

विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यात अडचणी-
विमा कंपनीने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या आत नुकसानीची तक्रार ऑनलाईनवर दाखल करण्यास सांगितली होती. परंतु त्याची वेळेत जनजागृती न झाली नाही. शेतकऱ्यांना शेताकडे जाणारा रस्ता पावसामुळे बंद होते. तसेच मोबाईल नेटवर्क बंद पडल्यामुळे ऑनलाइन तक्रार दाखल करणे शक्य झाले नव्हते. शेतकऱ्यांच्या अडचणीनंतर कृषी आयुक्त कार्यालयाने जे शेतकरी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास अपयशी ठरले आहेत, त्यांचे ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्याचे कंपन्यांना आदेश दिले.

उजनी येथे शेतकऱ्यांचे साखळी आंदोलन

हेही वाचा-कृषी कायद्यावरून मोदींची नरमाईची भूमिका! चर्चेची तयारी दर्शवित विरोधकांना सहकार्याचे आवाहन

पीक विमा कंपनीकडून सरकारी आदेशाचे उल्लंघन-

प्रत्यक्षात शेतकरी जेव्हा ऑफलाइन अर्ज दाखल करायाला गेले, तेव्हा कंपनीने शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले नाहीत. संपूर्ण लातूर जिल्ह्यातील तसेच औसा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याचा ऑफलाईन अर्ज कंपनीकडून स्वीकारला गेला नाही. यामधून कंपनीचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. कृषी आयुक्त कार्यालयाने काढलेल्या अध्यादेशाचे कंपनीने पालन केले नाही. सरकारने केलेले पंचनामे ग्राह्य धरून कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी उजनी येथे शेतकरी व त्यांच्या मुलांचे 5 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनात वांगजी, चिंचोली, वडजी व अशीव अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीच निराशाच येते. पीकविम्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने न केल्याने औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. विमा कंपनीच्या या धोरणामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

Last Updated : Feb 8, 2021, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.