ETV Bharat / state

शेतकऱ्यांचा पीक विमा सरकारनेच भरावा; छावा संघटनेचे रास्ता रोको - farmers crop insurance

लातूर-औसा मुख्य मार्गावर आज छावा संघटनेटच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा पीक विमा सरकारनेच भरावा अशी मागणी संघटनेने केली. बराच वेळ आंदोलन सुरू असल्याने रस्त्यावरील वाहने ठप्प झाली होती. मागणी मान्य झाली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

छावा संघटनेटचे रास्तारोको आंदोलन
author img

By

Published : Jul 19, 2019, 6:15 PM IST

लातूर - दुष्काळी परिस्थितीने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. त्यातच यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिप हंगामच्या पेरण्या तर सोडाच शिवाय पीक विमा भरण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे सरकारनेच पीक विमा रक्कम भरावी, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज औसा येथे छावा संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

छावा संघटनेटचे रास्तारोको आंदोलन

लातूर जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. तर यंदाही पावसाने पाठ फिरवली असल्याने शेतकरी पीक विमा रक्कम भरू शकत नाहीत. त्यामुळे सरकारनेच शेतकऱ्यांचा पीक विमा भरावा. अशी मागणी छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी केली.

ऐन सकाळच्या प्रहरी लातूर-औसा मुख्य मार्गावर रास्ता रोको केल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार छावा संघटनेने व्यक्त केला आहे.

काय आहेत मागण्या -
गतवर्षीच्या पीक विम्याची रक्कम त्वरित अदा करावी, वीज बिल माफ करावे, वार्षिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. सरकारने शेतकऱयाचा पीक विमा भरावा.

Intro:बाईट : नानासाहेब जावळे-पाटील, कार्यध्यक्ष छावा संघटना
शेतकऱ्यांचा पीकविमा सरकारनेच भरावा : छावा संघटना
लातूर : दुष्काळी परस्थीतीने शेतकरी अडचणीत आहेत. यातच यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या पेरण्या तर झाल्याचं नाही शिवाय पीकविमा काढण्यासाठीही शेतकऱ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे सरकारनेच पीकविमा भरावा अशी अजब मागणी छावा संघटनेच्या वतीने रास्तारोको दरम्यान करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आज औसा येथे हा रास्तारोको करण्यात आला होता.
Body:लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे तर यंदाही पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पिकविम्याची रक्कम त्वरित अदा करावी, वीज बिल माफ करावे, वार्षिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यारख्या मागण्या करीत लातूर-औसा मार्गावर रास्तारोको करण्यात आला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन छावा संघटनेचे आण्णासाहेब जावळे पाटील यांनी लढा दिला होता. त्यानुसारच आता नानासाहेब जावळे यांनी लढा उभारला असून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली हा रास्तारोको करण्यात आला होता. राज्यस्तरीय बैठकीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राज्यभर आंदोलन उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार छावा संघटनेने व्यक्त केला आहे. Conclusion:ऐन सकाळच्या प्रहरी या मुख्य मार्गावर रास्तारोको केल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.