ETV Bharat / state

लातूर : शेतजमिनीची पुजा करत शेतकऱ्यांनी साजरी केली 'वेळ अमावस्या' - latur vel amavasya news

वेळअमावास्या दिवशी गजबजनाऱ्या शहरात तर शेत शिवारात किलबिलाट अशी परिस्थिती असते. यावेळी तर कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य झाले नव्हते. पण आता कोरोनाचे सावट दूर होत असल्याने वेळ अमावस्यानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत.

लातूर - काळ्या मातीची पुजा करत शेतकऱ्यांनी साजरी केली 'वेळ अमावस्या'
farmers celebrate vel amavasya in latur
author img

By

Published : Jan 12, 2021, 4:24 PM IST

लातूर - मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वेळ अमावास्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भारता सारख्या कृषी प्रधानदेशात कृषिशी निगडित अनेक सणवार असतात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या. शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. यावेळी गावातील सर्वजण आज शेतात वन भोजनाचा आनंद लुटतात.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया

दोन हंगामात मिळून ही केली जाते पुजा -

बैलपोळा आणि वेळ अमावस्या हे सण शेतक­यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे सण समजले जातात. बैल पोळ्याच्या दिवशी ज्याच्या जिवावर शेती चालते त्या बैलांना खाऊपिऊ घालून पुजा केली जाते. तर वेळ अमावस्येच्या दिवशी ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालतो, त्या काळ्या आईची पुजा केली जाते. लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील कृषी संस्कृतीत ही वेळ अमावस्येची पुजा महत्त्वाची मानली जाते. या दिवशी शेतात कडब्याचे कोप करून शेताततल्या लक्ष्मीची पुजा मांडली जाते. शेतात खरीप व रब्बी या दोन हंगामात मिळून ही पुजा केली जाते. यावेळी मातीच्या लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. कडब्याच्या कोपात लक्ष्मीची प्रतिष्ठापना करतात. शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफूल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी प्रार्थना केली जाते.

अंबीलला पहिल्या दर्जाचा मान -

पेरणीनंतरची सातवी अमावस्या म्हणजे ही वेळ अमावस्या. जुनमध्ये पेरणी होते व सातवी अमावस्या डिसेंबरमध्ये येते. खरीपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते. ऊसाची गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते. घरोघरी गौरीपुजनाचे महत्त्व जितके असते, तितकेच महत्त्व शेतात या दिवशीच्या लक्ष्मीपुजनाला असते. पेरणी केलेल्या रानात उंडे व अंबीलचा काला तसेच पाण्याचा चर शिंपडला जातो. तोंडातून हर हर महादेव, हरभला असे म्हणत तो सर्व शेतीत फिरतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, सर्व भाज्यांपासून तयार केली जाणारी भाजी व अंबील या पदार्थांना वेळ अमावस्येच्या दिवशी जेवणात पहिल्या दर्जाचा मान असतो. या व्यतिरिक्त जो तो आपल्या कुवतीप्रमाणे अन्य पदार्थ तयार करतो. नुकताच आलेला वाटाणा, तुरीचे दाणे घालून केलेली भाजी, तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावून केलेली अंबील, अशा पदार्थाचा आस्वाद घेण्यात येतो. अंबील, गव्हाची खीर, भज्जी, भाकरी, कुटलेली शेंगदाण्याची चटणी, हिरव्या मिरचीचा ठेसा, असा बेत आखलेला असतो. आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू लाभदायी ठरावा. यासाठी या काळात येणारा भाजीपाला फळे भरपूर खाऊन निरोगी राहण्याचा सल्ला आहार तज्ञ देतात. हिवाळ्यामध्ये शरीराला आतून उब मिळावी व थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी बाजरीची भाकरी तसेच गरम पदार्थाची घरोघरी मेजवानी असते.

हेही वाचा - पूर्ण नियोजन करूनच पाठवण्यात आली लस; विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.