ETV Bharat / state

लातुरात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या - लातूर बातमी

सोमवारी सकाळी 11 वाजता पत्नी व बहिणीला शेताकडे जाऊन येतो असे सांगून अत्रिनंदन घरा बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतात असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

farmer-suicide-in-latur
farmer-suicide-in-latur
author img

By

Published : Jan 2, 2020, 11:54 AM IST

लातूर- येथील भालकी तालुक्यातील आळवाई येथील अत्रिनंदन हरिश्चंद्र भंडारे (वय 42) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल शेतकऱ्याने उचलले आहे.

हेही वाचा- दहशतवाद्यांशी लढताना कराडचा सुपुत्र जम्मू-काश्मिरमध्ये धारातिर्थी; मुंढे गावावर शोककळा

सोमवारी सकाळी 11 वाजता पत्नी व बहिणीला शेताकडे जाऊन येतो असे सांगून अत्रिनंदन घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतात असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी खिशात लिहून ठेवलेल्या मजकुरात एसबीआयचे कर्ज, वैयक्तिक व ट्रॅक्टरचे काढलेले कर्ज, कृषी सहकारी पत संस्थेच्या कर्जासह, खासगी कर्जाचा बोजा फेडणे अशक्य होत चालले आहे. सततची नापिकी, पिकांवर होणाऱ्या किडीचा प्रार्दुभाव यासह अवर्षण परिस्थितीमुळे मी हतबल ठरलो आहे. आता तूच माझ्या तीन लहान लेकरांसह कुटुंबाची काळजी घे, अशी बहिणीकडे विनंती अत्रिनंदन यांनी पत्रातून केली आहे.

शवविच्छेदन व शासकीय कार्यवाही नंतर पंचनामा करुन मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,आई, वडील असे कुटुंब आहे. भंडारे यांच्या आत्महत्येबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या Body:आळवाई येथील कर्जबाजारी शेतकरी अत्रिनंदन भंडारे यांची आत्महत्या

निलंगा/प्रतिनिधी

भालकी तालुक्यातील आळवाई येथील अत्रिनंदन हरिश्चंद्र भंडारे (42) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी रोजी सकाळी 11 वाजता पत्नी व बहिणीला शेताकडे जावून येतो असं सांगून अत्रिनंदन घरा बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी शेतात असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी खिशात लिहून ठेवलेल्या मजकुरात एसबीआय बँकेचे, वैयक्तिक व ट्रॅक्टरचे काढलेले कर्ज, कृषी सहकारी पत संस्थेच्या कर्जासह, खासगी कर्जाचा बोजा माझ्याकडून फेडणे अशक्य होत चालले आहे. सततची नापिकी, पिकांवर होणाऱ्या किडीचा प्रार्दुभाव यासह अवर्षण परिस्थितीमुळे मी हतबल ठरलो आहे. आता तूच माझ्या तीन लहान लेकरांसह कुटुंबाची काळजी घे, अशी बहिणीकडे विनंती अत्रिनंदन यांनी पत्रातून केली आहे.

शवविच्छेदन व शासकीय कार्यवाही नंतर पंचनामा करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केले असता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा,आई, वडील असे कुटुंब आहे. भंडारे यांच्या आत्महत्येबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.Conclusion:आत्महत्या करताना शेतक-याने खिशात लिहून ठेवाली होती चिठ्ठी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.