ETV Bharat / state

भाजीपाल्याच्या दराचे वास्तव; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल - कांदा दर

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले. मागणी आणि आवक यांचे समीकरण न जुळल्याने कांद्याला भरघोस भाव मिळत आहे. मात्र, लातूरच्या बाजारात सोमवारी लिंबू 5 रुपये किलो, टॉमेटो 8 रुपये किलो, तर मेथी थेट जनावरांपुढे, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे कांदा सोडला, तर इतर भाजीपाला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

kanda
र भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्याने शेतऱ्यांवर तो रस्त्यावर फेकण्याची आणि जनावरांना खाऊ घालण्याची वेळ
author img

By

Published : Dec 9, 2019, 7:07 PM IST

लातूर - कांद्याच्या वाढत्या दराचा बाऊ होत असला, तरी इतर भाजीपाला कवडीमोल दरात विकला जात आहे. कांद्यामुळे काही मोजक्या शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. मात्र, इतर भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्याने तो रस्त्यावर फेकण्याची आणि जनावरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

कांदा वगळता सर्व काही कवडीमोल

यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले. मागणी आणि आवक यांचे समीकरण न जुळल्याने कांद्याला भरघोस भाव मिळत आहे. मात्र, लातूरच्या बाजारात सोमवारी लिंबू 5 रुपये किलो, टोमॅटो 8 रुपये किलो, तर मेथी थेट जनावरांपुढे, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे कांदा सोडला, तर इतर भाजीपाला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

हेही वाचा - ग्राहकांना दिलासा... पुण्यात कांद्याच्या किंंमतीत घसरण

गेल्या २ दिवसांपासून कांद्याचे दरही घसरू लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला असे म्हणता येणार नाही. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. ही दरवाढही लहरीपणासारखीच होती. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना समप्रमाणात लाभ झाला असे नाही.

Intro:ग्राउंड रिपोर्ट : भाजीपाल्याच्या दराचे वास्तव ; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल
लातूर : वाढत्या कांद्याच्या दराचा बाऊ होत असला तरी इतर भाजीपाला कवडीमोल दारात विकला जात आहे. कांद्यामुळे काही मोजक्या शेतकऱ्यांना आधार मिळाला असला तरी या वाढलेल्या दरामुळे सर्व काही बदलले असे नाही... शेतकऱ्यांच्या बाबतीतची दुसरी बाजू मांडणारा 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट....

Body:आज कांद्याला किलोमागे 80 ते 100 रुपये मिळत आहे.... दरवर्षी नैसर्गिक संकटाला सामोरे जाणाऱ्या संकटामुळेच हे दरही वाढले आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बाजारात दाखल झाला नाही आणि उन्हाळी कांदाही शेतकऱ्यांकडे नसल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.... दुसरीकडे मात्र, इतर भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल दारात विकावा लागत आहे.... कांद्याच्या वाढीव दरामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सर्वच शेतकऱ्यांची स्थिती बदलली असे नाही.... लातूरच्या बाजारात सोमवारी 5 रुपये किलो लिंबू....8 रुपये किलो टॉमेटो तर आठ दिवसाखाली 20 रुपयाला विकली जाणारी मेथीची पेंडी थेट जनावरांपुढं पाहायला मिळाली... त्यामुळे कांदा एक सोडला तर इतर भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागत आहे... यामध्ये शेतकरी आणि ग्राहकांमध्ये असलेल्या व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे हे नक्की.... गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे दरही घसरू लागले आहेत... त्यामुळे कांद्याच्या दरवाढीने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला असेही म्हणता येणार नाही....

Conclusion:आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे.... ही दरवाढही लहरीपणासारखीच आहे... त्यामुळे सर्वच शेतकऱ्याना आणि समप्रमाणात लाभ झाला असेही म्हणता येणार नाही हे नक्की...
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.