लातूर - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरभरून मते दिली आहेत. राज्यात 40 लाख मतदान आणि एक उमेदवार दिल्लीत गेला आहे. निवडणूक केंद्राची असली तरी खरा उद्देश हा आगामी काळात असणाऱ्या विधानसभेसाठीचाच होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत वंचितची योग्य पायाभरणी झाली असून याचे परिणामही येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलेच होतील, असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकीतच विधानसभेची पायाभरणी - प्रकाश आंबेडकर - विधानसभेसाठी
लोकसभेची निवडणूक केंद्राची असली तरी खरा उद्देश हा आगामी काळात असणाऱ्या विधानसभेसाठीचाच होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत वंचितची योग्य पायाभरणी झाली असून याचे परिणामही येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलेच होतील, असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
डाॅ. प्रकाश आंबेडकर
लातूर - लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरभरून मते दिली आहेत. राज्यात 40 लाख मतदान आणि एक उमेदवार दिल्लीत गेला आहे. निवडणूक केंद्राची असली तरी खरा उद्देश हा आगामी काळात असणाऱ्या विधानसभेसाठीचाच होता. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत वंचितची योग्य पायाभरणी झाली असून याचे परिणामही येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलेच होतील, असा विश्वास अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकात विधानसभेची पायाभरणी : प्रकाश आंबेडकर
लातूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने भरभरून दिले आहे. राज्यात 40 लाख मतदान आणि एक उमेदवार दिल्लीत गेला आहे. निवडणूक केंद्राची असली तरी खरा उद्देश हा आगामी काळात असणाऱ्या विधानसभेचा होता. त्यामुळे पायाभरणी योग्य झाली असून याचे परिणामही येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगलेच होतील असा विश्वास ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर ते प्रथमच लातूर दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस- राष्ट्रवादी मधील गळती कायम असून राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार हे वंचितच्या संपर्कात आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मात्र, लोकसभेत ज्या ठिकाणी उमेदवार नाहीत व जिथे एका उमेदवाराचा 3 पेक्षा अधिक वेळेस पराभूत झाला आहे अशा जागांची मागणी वंचितने काँग्रेसकडे केली होती. केवळ ही गोष्ट त्यांनी मान्य न केल्याने काँग्रेसचे पानिपत झाल्याचा आरोपही यावेळी आंबेडकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीत मतदान समाधानकारक झाले असले तरी माझा पराभव कशामुळे झाला याचे स्पष्टीकरण 7 जून रोजी करणार आहे. शिवाय लातूर येथेही मतदान प्रक्रियेतील घोळबाबत तक्रार करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींचा उहापोह 7 जूनला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसची वोट बँक दिवसेंदिवस घटत असून केवळ मुस्लिम मतदारच त्यांच्या बाजूने आहे. मराठा आणि इतर सर्व समाज भाजपकडे वळला असून याचेच परिणाम त्यांना बसत आहेत. निवडणुकापूर्वी वंचित बहुजन आघाडीला भाजपाची 'बी' म्हणून आरोप केला जातो परंतु जनतेने दिलेला कौल हा सर्व काही सांगून जातो. सध्या जिल्हयाच्या ठिकाणी विधानसभेच्या अनुशंगाने बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, डॉ. अरविंद भातांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.