ETV Bharat / state

औराद शा.बॕरेजचे दरवाजे बंद करता न आल्या संपूर्ण पाणी गेले वाहून....

येणाऱ्या काळातील पाण्याच्या येवावर येथील पाण्याची स्थिती अवलंबून आहे. पुराच्या पाण्याने आजूबाजूची पूर्ण शेती नष्ट केली आहे. मात्र, भविष्यातील सिंचनासाठीच्या पाणीच आता वाहून गेल्याने दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती येथील शाखा अभियंता एस. आर. मुळे यांनी दिली.

doors of aurad sha barrage could not be closed and all water was carried away
औराद शा.बॕरेजचे दरवाजे बंद करता न आल्या संपूर्ण पाणी गेले वाहून
author img

By

Published : Oct 18, 2020, 10:57 AM IST

निलंगा (लातूर) - चार दिवसापूर्वी झालेल्या तुफान पावसात औराद शहाजानी येथे बॅरेज पूर्ण भरुन गेला होता. तेरणा नदीवरील या बॅरेजचे नऊ दरवाजे उघडण्यात आले होते. या बॅरजची क्षमता आहे 3.60 दलघमी. पुराच्या पाण्याबरोबर वाहून आलेली झाडे सोयाबीनच्या भनिम या दरवाजात अडकल्या कारणाने पूर ओसरल्यानंतर ही दरवाजा बंद करणे शक्य झाले नाही.

पाटबंधारे विभाग मागील दोन दिवसापासून दिवस-रात्र काम करतोय. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडकलेली झाडे आणि सोयाबीनचा कचरा निघता निघत नाहीये. दरवाजे बंद न करता आल्या कारणामुळे या बॅरेजेसमधील सर्व पाणी वाहून गेले. येणाऱ्या काळातील पाण्याच्या येवावर येथील पाण्याची स्थिती अवलंबून आहे. पुराच्या पाण्याने आजूबाजूची पूर्ण शेती नष्ट केली आहे. मात्र, भविष्यातील सिंचनासाठीच्या पाणीच आता वाहून गेल्याने दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे, अशी माहिती येथील शाखा अभियंता एस. आर. मुळे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.