ETV Bharat / state

जिल्हाधिकारीच अवतरले तानाजीच्या भूमिकेत, लातूरकरांची जिंकली मने - जिल्हाधिकारीच अवतरले तानाजीच्या भूमिकेत

खिलाडू वृत्ती असलेले लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत समोर आले आहेत. रविवारी विभागीय क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी तानाजी चित्रपटातील 'शंकरा रे शंकरा' या गाण्यावर डान्स केला.

District Collector  J. Shrikant performed the dance
जिल्हाधिकारीच अवतरले तानाजीच्या भूमिके
author img

By

Published : Feb 9, 2020, 10:31 PM IST

लातूर - खिलाडू वृत्ती असलेले लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत समोर आले आहेत. रविवारी विभागीय क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी तानाजी चित्रपटातील 'शंकरा रे शंकरा' या गाण्यावर डान्स केला. त्यांनी या सदाबहार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

विभागीय क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमात बीड, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता. यामध्ये नृत्य स्पर्धेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व त्यांच्या सहकार्यांनी तानाजी चित्रपटातील 'शंकरा रे शंकरा' या गीतावर अप्रतीम असे समूह नृत्य सादर केले. अशा कार्यक्रमादरम्यान नेहमीच काहीतरी हटके करून दाखविणारे जी. श्रीकांत हे आज तानाजीच्या भूमिकेत होते. शनिवारी क्रिकेट सामन्यात विजय मिळवल्यानंतरही त्यांनी सहकाऱ्यांसोबत एका गाण्यावर असाच ठेका धरला होता. विभागीय स्पर्धेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून महसूलसह सर्व विभागातील कर्मचारी हे सराव करीत होते. केवळ एका गाण्यावर त्यांनी नृत्य केले नाही, तर संबंध तानाजी चित्रपटच प्रेक्षकांसमोर ठेवला.

जिल्हाधिकारीच अवतरले तानाजीच्या भूमिकेत

तानाजी मालुसरे यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेवून प्रथम शत्रूच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सर करण्याचा निर्धार केला होता. यामध्ये कोंडाणा तर मिळाला परंतू, तानाजीला वीरमरण आले होते. याचेही दर्शन जिल्हाधिकारी तसेच त्यांच्या सहकार्यांच्या अभिनयातून पाहावयास मिळाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात परभणी जिल्ह्यातील कलाकारांनी केली. बीड, नांदेड, औरंगाबाद येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कलागुणांचा अविष्कार दाखवून दिला. खरी रंगत आणली ती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नृत्याने.

Intro:अन जिल्हाधिकाऱ्यांनी अवतरले तानाजीच्या भूमिकेत ; लातूरकरांनी जिंकली मने
लातूर : खिलाडू वृत्ती असलेले लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आतापर्यंत आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकेत समोर आले आहेत. रविवारी विभागीय क्रीडा स्पर्धेतील सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी तानाजी चित्रपटातील 'शंकरा रे शंकरा' या गाण्यावर डान्स केला. त्यांनी या सदाबहार नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
Body:विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात बीड, लातूर, नांदेड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांचा समावेश होता. यामध्ये नृत्य स्पर्धेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व त्यांच्या सहकार्यांनी तानाजी चित्रपटातील 'शंकरा रे शंकरा' या गीतावर अप्रतिम असे समूह नृत्य सादर केले. अशा कार्यक्रमादरम्यान नेहमीच काहीतरी हटके करून दाखविणारे जी. श्रीकांत हे आज तानाजीच्या भूमिकेत होते. शनिवारी क्रिकेट सामन्यात विजय मिळवल्यानंतरही त्यांनी सहकाऱ्यांसोबत एका गाण्यावर असाच ठेका धरला होता. विभागीय स्पर्धेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून महसूलसह सर्व विभागातील कर्मचारी हे सराव करीत होते. केवळ एका नाग्यावरच त्यांनी नृत्य केले नाही तर संबंध तानाजी चित्रपटच प्रेक्षकांसमोर ठेवला. तानाजी मालुसरे यांनी मुलाचे लग्न बाजूला ठेवून प्रथम शत्रूच्या ताब्यातील कोंडाणा किल्ला सर करण्याचा निर्धार केला होता. यामध्ये कोंडाणा तर मिळाला परंतु तानाजीला शूरमरण आले होते. याचेही दर्शन जिल्हाधिकारी तसेच त्यांच्या सहकार्यांच्या अभिनयातून पाहवयास मिळाले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि लातूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरवात परभणी जिल्ह्यातील कलाकारांनी केली. बीड, नांदेड, औरंगाबाद येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कलागुणांचा अविष्कार दाखवून दिला. खरी रंगत आणली ती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नृत्याने. Conclusion:कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वृषाली केसकर यांनी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.