ETV Bharat / state

लातूर पाणीटंचाई : 2016 मध्ये घेतलेला 'तो' निर्णय राबिवण्याबाबत मनपा अजूनही उदासीनच - बोर पुनर्भरण लातूर

6 लाख लोकवस्ती असलेल्या शहराला अद्यापपर्यंत शाश्वत असा पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा धरणावर शहराची तहान भागते. शिवाय अनियमित पाऊस यामुळे दरवर्षी शहरातील पाणीटंचाई ही ठरलेलीच आहे. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि परतीच्या पावसामुळे किमान दहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले आहे. पण महानगपालिकेने आहे त्या बोरचे पुननर्भरण करून सिंचनावर भर दिला नाही.

water crisis in latur
लातूर पाणीटंचाई
author img

By

Published : Aug 11, 2020, 2:43 PM IST

लातूर - दरवर्षी शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. हे वास्तव असले तरी तरी योग्य ती उपाययोजना राबवण्याबाबत मनपाची उदासीनता कायम समोर आली आहे. तहान लागली की विहीर खोदायची अशीच मनपाची अवस्था आहे. याप्रमाणेच 2016 च्या भीषण दुष्काळानंतरच शहरातील 300 बोरचे पुननर्भरण करण्यात होते. तेव्हापासून पुननर्भरणचे प्रमाण कमी झाले तर यंदा तर एकाही बोरचे पुननर्भरण करण्यात आलेले नाही. उलट प्राध्यापक जे. एम. धाराशिवे यांनी 16 वर्षांपूर्वी बोरचे पुननर्भरण केले आहे. त्यामुळे त्यांना आतापर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागलेला नाही.

लातूर पाणीटंचाई : 2016 मध्ये घेतलेला 'तो' निर्णय राबिवण्याबाबत मनपा अजूनही उदासीनच

6 लाख लोकवस्ती असलेल्या शहराला अद्यापपर्यंत शाश्वत असा पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांजरा धरणावर शहराची तहान भागते. शिवाय अनियमित पाऊस यामुळे दरवर्षी शहरातील पाणीटंचाई ही ठरलेलीच आहे. मात्र, यावर्षी जिल्हा प्रशासनाचे नियोजन आणि परतीच्या पावसामुळे किमान दहा दिवसांतून एकदा पाणी मिळाले आहे. पण महानगपालिकेने आहे त्या बोरचे पुननर्भरण करून सिंचनावर भर दिला नाही.

भीषण पाणीटंचाईमुळे 2016 साली रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. त्याच वर्षी सार्वजनिक बोरच्या पुनर्भरणावर मनपाने लक्ष केंद्रित केले होते. शिवाय ज्या नागरिकांनी घरच्या बोरचे पुनर्भरण केले आहे त्या नागरिकांना मालमत्ता करात 5 टक्के सुटही देण्याचे ठरविले होते. मात्र, ही तत्परता त्या वर्षापूरतीच मर्यादित राहिली आहे. त्यामुळे 1 हजार 50 पैकी केवळ 300 बोरचे पुनर्भरण झाले आहे.

तर दुसरीकडे शहरातील प्राध्यापक जे. एम. धाराशिवे यांनी 2004 मध्ये केवळ 200 फूट बोर घेऊन त्याचे पुनर्भरण केले होते. आज 16 वर्षानंतरही त्यांना पाण्याची कमतरता भासलेली नाही. इककेच नव्हे तर 2016 साली सबंध लातूरकरांना रेल्वेच्या आणि विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागली होती. मात्र, प्राध्यापक धाराशिवे यांना एक घागरही पाणी विकत घ्यावी लागली नव्हती.

धाराशिवे यांच्या या उपक्रमामुळे मनपाने मालमत्ता करात 5 टक्के सूट दिली. मात्र, बोर पुनर्भरणसाठीची मोहीमच खंडित झाली. शिवाय चालू वर्षात एकाही बोरचे पुनर्भरण मनपाने केलेले नाही. उलट कोरोनाचे कारण सांगून मनपाने हात झटकले आहेत. यातच यंदा पावसाने समाधानकारक सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यातही बोर पुनर्भरणाबाबत मनपा किती गांभीर्याने घेईल याबाबत शंका आहे.

गेल्या चार वर्षात बोरचे आणि पुनर्भरणाची संख्या वाढली नाही. कायम पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या लातूर शहराची ही अवस्था आताही कायमच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.