ETV Bharat / state

पावसाने पपईंचा पडला सडा, कर्ज काढून पिकवलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

चार दिवसांपूर्वी मानेजवळगा सावरी औरादशा तगरखेडा हालसी या भागात मोठा पाऊस झाला आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच पपईची लागवड केली होती. मात्र, एका रात्रीत हाता-तोंडाशी आलेले पपई पीक संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि हाती आली ती फक्त निराशा.

निलंगा
निलंगा
author img

By

Published : Oct 18, 2020, 10:18 AM IST

निलंगा (लातूर) - सावकारी कर्ज काढून पहिल्यांच तीन एकरावर पपई फळभाग केली आणि एका रात्रीत पावसाच्या पाण्याने ती उद्ध्वस्त झाली. वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला आणि संपूर्ण शेतात पपईचा सडा झाला, अशी दूरवस्था झालीय तालुक्यातील माने जवळगा येथील दोन शेतकऱ्यांची.

पावसाने पपईंचा पडला सडा, कर्ज काढून पिकवलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

गोविंदराव बसूदे यांनी तीन एकरवर पपई लागवड केली, तर दिगंबर बसूदे यांनी दोन एकरवर लागवड केली. या दोन्ही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पहिल्यांदाच पपईची लागवड केली होती. मात्र, एका रात्रीत हाता-तोंडाशी आलेले पपई पीक संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि हाती आली ती फक्त निराशा. गोविंदराव बसूदे यांच्या दोन्ही मुलांनी शेतात नवीन काहीतरी प्रयोग करावा म्हणून तीन एकरावर दोन लाख रुपये खर्चून पपई लागवड केली. लागवड करतानाचे सर्व पैसे खासगी सावकाराकडून घेतले. पपई चांगली जोमात आली, काही दिवसांनी व्यापारी ही पपई घेऊन जाणार होते. फळ एवढे बहरात आले होते दहा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते.

हेही वाचा - राजा प्रजेसोबत असायला हवा, आपला राजा तर कुटुंबात व्यग्र; रावसाहेब दानवेंची टीका

चार दिवसांपूर्वी मानेजवळगा सावरी औरादशा तगरखेडा हालसी या भागात मोठा पाऊस झाला आणि एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. या भागातील सगळ्याच बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत. गोविंदराव बसूदे व दिंगबर बसूदे या दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून लाखो रूपये खर्चून उभा केलेली बाग व बागेतील फळे तळ हाताच्या फोडा प्रमाणे सांभाळून डोळ्यासमोर रानावर सडून जात असल्याचे पाहून रडू येत होते.

शासनाने मदत करावी, अशी या दोन्ही शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, शासनाच्या व कृषी विभागाच्या पंचनाम्यातच हे फळ नुकसान भरपाईमध्ये येत नाही, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाला संपर्क साधून घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु, एवढे मोठे नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांच्या नशिबी निराशाच आली आहे. आम्ही जगावे का मरावे? असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.