लातूर - शहरातील अनधिकृत होर्डींग्स प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याबाबतची नोटीस मुंबई उच्च न्यायलयाच्या लातूर कोर्ट कमिशने महानगरपालिका आयुक्तांना पाठवली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने शहरातील विविध भागात होर्डींग्स लागले आहेत. (Court Issues Notice to Latur Municipal Commissioner) अनधिकृत होर्डींग्स लावून लातूर शहरास अतिशय विद्रूप करण्यात आले असून, शहरात अवैधरीत्या लाखो झेंडे, कमानी, फलक लावले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात यातून किती उत्पन्न झाले?
सध्या संपूर्ण लातूर शहरात लावलेल्या अधिकृत होडींग्सच्या शहरातील जागा, त्यांचे दर / भाव आपल्या महानगरपालिकेने प्रत्येक चौरस फुटाला किती ठेवले आहेत? गेल्या आर्थिक वर्षात यातून किती उत्पन्न झाले? त्याचाही सविस्तर तपशील द्यावा. (Hoardings Erected on Amit Deshmukh Birthday) तसेच, सध्या आपण किती आणि कुठे-कुठे झेंडे, कमानी, होडींग्स लावण्यासाठी नियमानुसार परवानगी दिली आहे.
नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांत उत्तर द्यावे
दरम्यान, याबाबतची सविस्तर यादी आम्हाला पाठवावी व परवानगीव्यतिरिक्त कोणी अनाधिकृत होर्डींग्स लावले असतील तर त्यावर आपण ताबडतोब कार्यवाही करावी. तसेच, त्याची सविस्तर माहिती नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत उच्च न्यायालय, मुंबई यांना पाठवावी. याचबरोबर त्याची एक प्रत लातूर कोर्टला पाठवावी असेही आदेश देण्यात आले आहेत.
अद्याप लातूर मनपा प्रशासनाने अनधिकृत होर्डींग प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही
मुंबई उच्च न्यायालयाचे लातूरचे कोर्ट कमिशनर ॲड. जगन्नाथ चिताडे यांनी आजपर्यंत लातूरचे महापालिका कमिशनर यांना तब्बल 14-15 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतू अद्याप लातूर मनपा प्रशासनाने अनधिकृत होर्डींग प्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालायाच्या आदेशाप्रमाणे (जनहित याचिका क्र.155/2011 दि. 26 नोव्हेंबर, 2015 परिच्छेद क्र. 28) उच्च न्यालयाने नेमणूक केलेल्या आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर उचित कारवाई करणे गरजेचे आहे.
मनपा आयुक्तांनी सदरील नोटीस गांभीर्याने घ्यावी
दरम्यान, अशी त्यांच्याकडून कारवाई झाली नाही किंवा त्याची दाखल घेतली नाही तर हे कृत्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारे ठरेल असही ते म्हणाले आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांनी सदरील नोटीस गांभीर्याने घ्यावी. अन्यथा, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला म्हणून लातूर महानगरपालिकेचे कमिशनर अमन मित्तल यांच्यावर योग्य ती कारवाई होइल, असेही कोर्ट कमिशनर ॲड. जगन्नाथ चिताडे यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
हेही वाचा - Petrol price hike : निवडणुका संपल्या इंधन दरवाढ सुरू, घरगुती वापराचा गॅस तब्बल 50 रुपयांनी महागला