ETV Bharat / state

लातूर: ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक, संसर्ग वाढत असल्याने लॉकडाऊनची नामुष्की - corona increase latur taluka

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा १० हजाराच्या घरात पोहोचला आहे. सुरुवातीच्या काळात केवळ शहरी भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. जिल्ह्यातील उदगीर शहरात २५ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला होता. मात्र, ४ महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारावर पोहोचली आहे.

लातूर
लातूर
author img

By

Published : Sep 7, 2020, 8:30 PM IST

लातूर- कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सुरुवातीच्या काळात कुठे गाव बंदी तर कुठे नाकाबंदी गावकऱ्यांनी केली होती. मात्र, काळाच्या ओघात या यंत्रणामध्येही सातत्य राहिले नाही. परिणामी, ज्या गोष्टीची जिल्हा प्रशासनाला धास्ती होती तीच गोष्ट होताना पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ हे बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहेत. शहरे अनलॉक असली तरी गावे आता लॉकडाऊन होऊ लागली आहेत.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा १० हजाराच्या घरात पोहोचला आहे. सुरुवातीच्या काळात केवळ शहरी भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. जिल्ह्यातील उदगीर शहरात २५ एप्रिलला पहिला रुग्ण आढळला होता. मात्र, ४ महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारावर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत ३१४ जणांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात १५ जुलै ते ३१ जुलै पर्यंत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लॉकडाऊन घोषित केला होता. यामुळे वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यात यश मिळेल, असा आशावाद बाळगला जात होता. परंतु, अनलॉक घोषित होताच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. ग्रामीण भागात जर कोरोनाचा शिरकाव झाला, तर आरोग्य यंत्रणेवर ताण आणि ग्रामस्थांची गैरसोय होईल म्हणून विशेष काळजी घेतली जात होती. मात्र, यामध्ये सातत्य राहिले नाही. परिणामी गावागावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. लातूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुरूड गावात जूनपर्यंत एकही रुग्ण नव्हता. परंतु, गेल्या दीड महिन्यात प्रादुर्भाव वाढला आणि रुग्णांची संख्या १४५ वर गेली. त्यामुळे, आजपासून गावातील बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. तर ग्रामपंचायतीने गावातील खासगी डॉक्टर्स यांच्या मदतीने 'फेव्हर रुग्णालय' उभारले आहे. या ठिकणीच रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.

ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील त्यांना उपचारासाठी पाठवले जाणार आहे. शिवाय डॉक्टरांच्या परवानगीशिवाय रुग्णांना मेडीकलमधून औषधे दिली जाणार नाहीत, असा निर्णयही घेण्यात आला आहे. तांदूळजा येथेही वाढत्या रुग्णसंख्येमुळे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय औसा तालुक्यातील उजणी येथेही गत आठवड्यात बंद पुकारण्यात आला होता. सध्या जिल्ह्यातील तालुक्याची ठिकाणे पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. मात्र, ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांना स्वत:हून बाजारपेठा बंद कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे, उपाचार करणेही सोपे होते. पण, ग्रामीण भागात ना यंत्रणा, ना मनुष्यबळ त्यामुळे आरोग्य यंत्रणेला स्वतंत्र प्लॅन करावा लागणार. अन्यथा ग्रामीण भागातील जनतेची परवडच होणार.

हेही वाचा- कॅन्सरग्रस्ताच्या मदतीला सरसावले संपूर्ण गाव, हरीजवळग्यात एकोप्याचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.