ETV Bharat / state

CORONA : 'लातूर पॅटर्न'लाही कोरोनाचा फटका... अर्थकारणावर परिणाम - corona go

लातुरातील शाळा महाविद्यालयापेक्षा येथील कोचिंग क्लासेसचा परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. दहावीची परीक्षा संपताच व्हॅकेशनसाठी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असतात. यंदा मात्र, दहावीची परीक्षा अंतिम टप्यात असतानाच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा-महाविद्यालयांसह येथील शंभरहून अधिक क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.

latur
CORONA : लातूरातील कोचिंग क्लासेस बंद; अर्थकारणावर परिणाम
author img

By

Published : Mar 16, 2020, 11:51 PM IST

लातूर - कोरोनामुळे इतिहासात प्रथमच लातुरातील कोचिंग क्लासेस बंद राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे क्लासेस परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून याचा लातूरच्या अर्थकारणावर ही परिणाम होणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या असतात. ऐन व्हॅकेशनच्या कालावधीमध्येच हे क्लासेस बंद राहिल्याने अर्थकारणावर परिणाम होणार आहे.

CORONA : लातूरातील कोचिंग क्लासेस बंद; अर्थकारणावर परिणाम

लातुरातील शाळा महाविद्यालयापेक्षा येथील कोचिंग क्लासेसचा परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. दहावीची परीक्षा संपताच व्हॅकेशनसाठी हजारो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असतात. यंदा मात्र, दहावीची परीक्षा अंतिम टप्यात असतानाच कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शाळा-महाविद्यालयांसह येथील शंभरहून अधिक क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती : विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षकांची हजेरी

पंधरा दिवस हे क्लासेस बंद राहणार असल्याने व्हॅकेशन बॅचवर याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. क्लासेससह या परिसरातील लहान मोठ्या उद्योगावरही परिणाम झाला असून या मुख्य भागातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. विद्यार्थ्यांनी गावाकडे जाणे पसंत केले आहे. तर या परिसरात केवळ क्लासेस चालक आपली कामे पूर्ण करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा परिणाम आता लातूरसारख्या शहरातील अर्थकारणावर होऊ लागला आहे. त्यामुळे शेतीमालासह सर्वच बाबींवर याचा परिणाम जाणवू लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.