लातूर - विधानसभेच्या तोंडावर भाजपच्या मेगा भरतीमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेकांची गर्दी वाढत आहे. मात्र, या भरतीवरून मुख्यमंत्र्यांनी लातुरात सूचक विधान केले आहे. प्रवेश केला म्हणजे तिकीट मिळेलच असे नाही. त्यामुळे विविध पक्षातून भाजपात प्रवेश करणाऱ्यांसाठी हे धाकधूक वाढविणारे विधान आहे.
हेही वाचा - दिग्विजय सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; 'भाजप-बजरंग दल आयएसआयकडून पैसे घेते'
भाजपात मेगाभरती असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये त्यापेक्षा अधिकची महागळती सुरू आहे. भाजपात आजही 98 टक्के हे मूळचे कार्यकर्ते आहेत. दोन टक्के इतरांचे इन्कामिंग झाले असले तरी पक्षाची ताकद त्यामुळे वाढत आहे. विरोधकांची हवा आता संपली आहे. कारण लोकांच्या चेहऱ्यात काय दडलय हे आम्हालाच समजत असून बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला आरशात पाहण्याचा सल्ला देऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा - भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल
लातुरात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण स्थिती आहे. अशीच अवस्था राहिली आणि परतीचा पाऊस झाला नाही, तर सर्व ते पर्याय उपलब्ध केले जातील. उजनीचे पाणी हाच कायस्वरूपी पाणी प्रश्न मिटविण्याचा पर्याय आहे. त्याअनुषंगाने काम सुरू असून 1400 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच ही योजना मार्गी लागेल. शिवाय वाटरग्रीडचा प्रकल्पही लवकरच प्रत्यक्षात सुरू होईल, तसा आराखडाही तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर 'बर्निंग बस'चा थरार, प्रवासी सुखरुप
पत्रकार परिषदेत अनेक योजनांची माहिती देऊन मराठवाड्यात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून जनतेचे आभार मानले.