लातूर : पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सांगितले की, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासोबत 2018 मध्ये विवाह झाला. विवाहनंतर सासू, ननंद व पती नेहमी मानसिक त्रास (Physical and mental torture of wife) देऊ लागले. हुंड्यासह (torture of wife for dowry) इतर किरकोळ कारणावरून वाद घालून मारहाण करीत होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले. एप्रिल 2021 मध्ये पतीने मला मुलासह माहेरी नेऊन सोडले. त्यानंतर ते नांदवायला तयार झाले नाहीत. नोकरी करणे गरजेचे होते म्हणून नाईलाजाने मुलासमवेत पुण्यातील हिंजवडी येथे राहायला आले. तरीही पती फोन करून शिवीगाळ व दमदाठी करीत. त्यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार (case registered against Deputy Collector) दिली होती.
पत्नीला जीवे मारण्याची धमकी: त्यानुसार तेथे गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर पती गणेश महाडिक यांनी माफी मागितल्याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत लातूर येथे वास्तव्यास आले. काही दिवस पतीने व्यवस्थित वागणूक दिली. मात्र त्यानंतर "माझ्या कुटुंबातील लोकाविरुद्ध तक्रार का केलीस ? तक्रार मागे घे अन्यथा तुझ्या माहेरी काही न सांगता तुला जिवे मारीन" अशी दमदाटी करून पतीने मारहाण व मानसिक त्रास दिला. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष केले. 2022 मध्ये सासू लता लातूर येथे राहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दोघांनी माझा छळ करत मारहाण केली. या मारहाणीत मिताली यांच्या छातीच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयातही नेले होते.
उपजिल्हाधिकारी फरार : मिताली महाडिक यांच्या फिर्यादिवरुन लातूरचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, सासू लता महाडिक यांच्या विरोधात लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप उपजिल्हाधिकारी आरोपी गणेश महाडिक यांना अटक झाली नसून ते अद्याप फरार आहेत. लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा 'ई-टीव्ही भारत'ने प्रयत्न केला असता त्यांनी त्यास नकार दिला आहे.