ETV Bharat / state

लातूरमध्ये ५०० रुपयांची लाच घेताना रक्तपेढीचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

author img

By

Published : Apr 15, 2020, 11:42 PM IST

लातूरमध्ये कामाचे बील आणि रुग्णवाहिकेच्या दुरूस्तीचे बील काढून देण्यासाठी चक्क ५०० रुपयांची लाच मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी व सहायक अधीक्षक यांना ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

officer arrest for 500 rupees bribe in Latur
५०० रुपयांची लाच घेताना रक्तपेढीचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लातूर - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी राबत आहेत. दुसरीकडे कामाचे बील आणि रुग्णवाहिकेच्या दुरूस्तीचे बील काढून देण्यासाठी चक्क ५०० रुपयांची लाच मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी व सहायक अधीक्षक यांना ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

उदगीर सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे वैज्ञानिक अधिकारी नटवरसिंग तवडी व सहायक अधीक्षक शिवराज धानुरे यांनी वैद्यकीय रजेचे बिल व ओव्हर टाईम कामाचे बिल ट्रेझरीला सादर करण्यासाठी ५०० रुपये लाच तक्रारदाराकडे मागितली होती. याशिवाय रुग्णवाहिकेच्या दुरूस्तीच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी टाळाटाळ केली होती.

यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी दुपारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तवडी व धानुरे यांना रंगेहाथ पकडले आहे. यासंबधी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती. तर हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक माणिक बेद्रे, पो.नि. कुमार दराडे व इतर कर्मचाऱ्यांनी घेतले. मात्र, ५०० रुपयांसाठी या अधिकाऱ्यांनी चक्क लाचेची मागणी केल्याची चर्चा उदगीर शहरात चांगलीच रंगली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.