ETV Bharat / state

कोरोना विषाणू : चीनमध्ये शिक्षण घेणारा आशिष गुरमे लातुरात दाखल

author img

By

Published : Feb 21, 2020, 1:38 AM IST

चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून तेथील विद्यापीठात महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी अडकून पडले होते. त्यामध्ये लातूर शहरातील आशिष गुरमे याचा समावेश होता. अखेर गुरुवारी आशिष लातूरमध्ये दाखल झाला आहे.

कोरोना विषाणू
कोरोना विषाणू

लातूर - चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून तेथील विद्यापीठात महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी अडकून पडले होते. त्यामध्ये लातूर शहरातील आशिष गुरमे याचा समावेश होता. अखेर गुरुवारी आशिष लातूरमध्ये दाखल झाला आहे.

चीनमध्ये अडकलेल्या ७ विद्यार्थ्यांमध्ये आशिष गुरमे हा एक लातूरमधला विद्यार्थी होता. तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या कोरेना विषाणू संसर्गामुळे भीतीची वातावरण असल्याने तो सुखरूप परतावा, असे त्याच्या पालकांना वाटत होते. अखेर गुरुवारी आशिष लातूरमध्ये दाखल झाला आहे.

आशिष गुरमे हा गेल्या दोन वर्षांपासून चीनमधील सियाचीन येथील एका विद्यापिठात शिक्षण घेत आहे. मात्र, सध्या कोरेना या घातक विषाणूचा संसर्ग वाढला असल्याने आशिषला विद्यापीठाच्या प्रशासनाने हॉस्टेलमधून बाहेर पडण्यास सक्त मनाई केली होती.

आई- वडिलांनी भारत सरकारकडे त्याला सुखरूप आणण्याची विनंती केली होती. त्यावर तो गुरुवारी भारतात दाखल झाला. दरम्यान लातूरच्या सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी केली असून तो व्यवस्थित असल्याचे सांगितले आहे.

चीनमधल्या वुहान शहरात सर्वात जास्त रुग्ण असून तिथेच हा व्हायरस सापडला होता. त्यामुळे चीन सरकारने हे शहर सार्वजनिक वाहतुकीपासून बंद केलं आहे. शहराचे सर्व रस्ते येण्या-जाण्यासाठी बंद केले असून नागरिकांना या शहरात जाण्यापासून आणि शहरात प्रवेश करण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.