ETV Bharat / state

अमित शाह यांचेही टार्गेट शरद पवारच; विकासाच्या मुद्यावरुन टीकास्त्र

जलसंधारण कामात अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा अपहार केला. शरद पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता घराणेशाहीला अधिकचे महत्व दिले. यामुळेच पक्षाची ही अवस्था झाली आहे, असे अमित शाह म्हणाले.

author img

By

Published : Oct 10, 2019, 11:13 PM IST

अमित शाह सभा

लातूर- विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित शाह यांनीही शरद पवार यांनाच टार्गेट केले आहे. विकासाच्या मुद्यावरुन आरोप करणाऱ्यांसाठी विकासाची गाथा सांगण्यासाठी सप्ताहाचेच आयोजन करावे लागणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. शिवाय 370 कलम हटीवण्याचा मुद्दा तर या निवडणुकीच्या प्रचारात असणारच, असेही यावेळी त्यांनी ठासून सांगितले. औसा मतदारसंघाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अमित शाह सभा

हेही वाचा- जाणून घ्या, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी किती केला होता खर्च

गेल्या 5 वर्षात महायुतीच्या काळात झालेल्या विकास कामाचा पाढा यावेळी अमित शाह यांनी वाचून दाखवला. स्वतंत्र काळात जे काम कोणी केले नाही ते 370 कलम हटीविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेसने मताची गोळाबेरीज करण्यात हे कलम हटविण्याकडे दुर्लक्ष केले होते. ते काम सत्ता स्थापन होताच मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे या कलम हटविण्याचा मुद्दा हा प्रचारात असणारच. शिवाय हे कलम हटविल्यानंतर अशांतता पसरेल, असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात तसे काही झाले नसून सर्व काही सुरळीत आहे. शेती, औद्योगिक, उद्योग यामध्ये मोठा विकास झाला असून 5 वर्षातील विकासकामे सांगण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे जलसंधारण कामात अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा अपहार केला. शरद पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता घराणेशाहीला अधिकचे महत्व दिले. यामुळेच पक्षाची ही अवस्था झाली आहे. शिवाय पवार यांनी 370 कलम हटविण्याबाबतची भूमिका जनतेसमोर मांडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकंदरीत विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्यांनी आघाडीकडून प्रचारात आघाडीवर असलेल्या शरद पवार यांनाच टार्गेट केले.

जिल्ह्यातील सर्व नाराज व्यासपीठावर
तिकीट वाटपावरुन नाराज असलेले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदरा सुधाकर भालेराव, सेनेचे दिनकर माने, सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. तर उमेदवार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबद्दल गौरव उद्गार काढले. तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही 17 वर्षाच्या राजकीय कारकीर्द मध्ये कुणाला दुखविले नसल्याचे स्पष्ट करुन अंतर्गत मतभेदवर पांघरुन टाकल्याचे सूर काढले. त्यामुळे आता अभिमन्यू पवार यांच्या प्रचारात ते सहभागी होणार का ? हे पाहावे लागणार आहे.

Intro:शाह यांचे टार्गेटही शरद पवारच ; विकासाच्या मुद्यावरून टीकास्त्र
लातूर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अमित शाह यांनीही शरद पवार यांनाच टार्गेट केले जात आहे. विकासाच्या मुद्यावरून आरोप करणाऱ्यांसाठी विकासाची गाथा सांगण्यासाठी सप्ताहाचेच आयोजन करावे लागणार असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले. शिवाय 370 कलम हटीवण्याचा मुद्दा तर या निवडणुकीच्या प्रचारात असणारच असेही यावेळी त्यांनी ठासून सांगितले. औसा मतदारसंघाचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Body:गेल्या 5 वर्षात महायुतीच्या काळात झालेल्या विकास कामाचा पाढा यावेळी अमित शाह यांनी वाचून दाखवला. स्वतंत्र काळात जे काम कोणी केले नाही ते 370 कलम हटीविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेसने मताची गोळाबेरीज करण्यात हे कलम हटविण्याकडे दुर्लक्ष केले होते. ते काम सत्ता स्थापन होताच मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे या कलम हटविण्याचा मुद्दा हा प्रचारात असणारच. शिवाय हे कलम हटविल्यानंतर अशांतता पसरेल असा अपप्रचार विरोधकांकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात तसे काही झाले नसून सर्व काही सुरळीत आहे. शेती, औद्योगिक, उद्योग यामध्ये मोठा विकास झाला असून 5 वर्षातील विकासकामे सांगण्यासाठी सप्ताहाचे आयोजन करावे लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे जलसंधारण कामात अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा अपहार केला. शरद पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता घराणेशाहीला अधिकचे महत्व दिले. यामुळेच पक्षाची ही अवस्था झाली आहे. शिवाय पवार यांनी 370 कलम हटविण्याबाबतची भूमिका जनतेसमोर मांडावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एकंदरीत विधानसभा निवडणुका लक्षात घेता त्यांनी आघडीकडून प्रचारात आघाडीवर असलेल्या शरद पवार यांनाच टार्गेट केले.

Conclusion:जिल्ह्यातील सर्व नाराज व्यासपीठावर
तिकीट वाटपावरून नाराज असलेले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आ. सुधाकर भालेराव, सेनेचे दिनकर माने, सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती. तर उमेदवार अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबद्दल गौरव उदगार काढले तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही 17 वर्षाच्या राजकीय कारकीर्द मध्ये कुणाला दुखविले नसल्याचे स्पष्ट करून अंतर्गत मतभेदवर पांघरून टाकल्याचे सूर काढले. त्यामुळे आता अभिमन्यू पवार यांच्या प्रचारात ते सहभागी होणार का हे पाहावे लागणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.