ETV Bharat / state

विधासभेच्या निवडणुकांमध्ये महाआघाडीचेच वर्चस्व राहणार; अमित देशमुखांना विश्वास

महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. सध्या महाआघाडीने जागा वाटपासह प्रचारात बाजी मारल्याने यंदाची विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:56 AM IST

Updated : Oct 8, 2019, 1:17 PM IST

लातूर - महायुतीमध्ये जागा वाटपावरून उद्भवलेल्या बंडखोरीचे प्रमाण मोठे असून, याचा फटका युतीलाच बसणार असल्याचे वक्तव्य आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. सध्या महाआघाडीने जागा वाटपासह प्रचारात बाजी मारल्याने यंदाची विधानसभा जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाआघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, जनतेने युती सरकारला 5 वर्ष सेवा करण्याची संधी दिली होती. मात्र, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, आर्थिक मंदी यांसारख्या समस्या कायम असून, जनतेमध्ये सरकारच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा भावांसाठी प्रचारात उतरलेला रितेश देशमुख ठरतोय नागरिकांचे आकर्षण

सध्या सत्ताधाऱ्यांकडून फक्त आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली आहे. पाण्याअभावी लातूर एमआयडीसी मधील 2000 पैकी 1600 उद्योग बंद आहेत. त्यामुळे सरकारचे खरे रूप जनतेच्या निदर्शनास आले असून, आगामी निवडणुकांमध्ये त्यांना योग्य जागा दाखवली जाईल, असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

हेही वाचा देशमुख बंधूंचा उमेदवारी अर्ज दाखल; रितेश जेनेलियाची उपस्थिती

राज्याच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांनी पक्षांतर केले असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज चाकूरकर यांनी आयारामांना टोला लगावला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज चाकूरकर, माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार त्रिंबक भिसे व जिल्ह्यातील महाआघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

Intro:तिकीट वाटपात बाजी आता निवडणुकांतही महाआघाडीचेच वर्चस्व : अमित देशमुख
लातूर : जागा वाटपावरून महायुतीमध्ये बंडखोरी आणि नाराजीचा सूर आता काही जनतेपासून लपून राहिलेला नाही. जिल्ह्यात याचे लोण अधिक प्रमाणात असून महायुतीला याचा फटका बसेलच. तर इकडे महाआघाडीने जागा वाटपात आणि प्रचारात बाजी मारली असून निवडणुकांमध्येही हेच चित्र राहणार असल्याचा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त केला. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महाआघाडी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

Body:जनतेने युती सरकारला 5 वर्ष सेवा करण्याची संधी दिली होती. मात्र, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, आर्थिक मंदी यासारख्या समस्या कायम असून जनतेमध्ये सरकारच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर आहे. केवळ आश्वासनांची खैरात केली जात असून प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत आहे. उजनीच्या पाण्याचे राजकारण करून सत्तेवर आलेल्या सरकारला त्याचाच विसर पडला आहे. पाण्याअभावी लातूर एमआयडीसी मधील 2000 पैकी 1600 उद्योग हे बंद आहेत. त्यामुळे सरकारचे खरे रूप जनतेच्या निदर्शनास आले असून आगामी निवडणुकांत त्यांना योग्य दाखवली जाईल असा विश्वास अमित देशमुख यांनी व्यक्त केला. तर प्रांताचा आणि राज्याच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताचा विचार करणाऱ्यांनी पक्षांतर केले असल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गायरामांना टोला लगावला. जिल्ह्यात युतीमध्ये जागा वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाय नाराजांचीही संख्या अधिक असून याचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारांना मिळणार असल्याचा विश्वास यावेळी सर्व उमेदवारांनी व्यक्त केला.

Conclusion:यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीप देशमुख, आ. त्रिंबक भिसे व जिल्ह्यातील महा आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
Last Updated : Oct 8, 2019, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.