ETV Bharat / state

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे 'ढोल बजाओ आंदोलन' - लातूर धनगर समाज आंदोलन

केवळ धनगढ हा अस्तित्वहीन शब्द पुढे करून धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी रेणापूर येथे रास्तारोको करून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

agitation-by-dhangar-community-for-reservation-in-latur
आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचे 'ढोल बजाओ आंदोलन'
author img

By

Published : Oct 27, 2020, 5:18 PM IST

लातूर - धनगर समाजातील अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. केवळ धनगढ हा अस्तित्वहीन शब्द पुढे करून धनगर समाजावर अन्याय केला जात आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी रेणापूर येथे रास्तारोको करून ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजातर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले

अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाजाकडून लढा उभा केला जात आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या समाजबांधवानी आंदोलन केले होते. आरक्षणाच्या अंमलबजावणी सोबत उच्च न्यायालयात एस.टी. आरक्षणासंदर्भात दाखल केलेली याचिका फास्टट्रॅक न्यायालयात घेण्यात यावी, मेंढपाळाच्या सुरक्षेतेसाठी कडक कायदे करावेत, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही शासकीय नोकरभरती करू नये, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील सास्तुर येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील नराधमांना कडक शासन करण्याची मागणी यावेळी धनगर समाजबांधवानी केली.

तहसीलदारांना दिले निवेदन

लातूर-अंबाजोगाई या मार्गावर दुपारी 12 च्या दरम्यान रास्तारोको करण्यात आला होता. त्यामुळे दोन तास रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. धनगढ आणि धनगर यावरून समाजातील काही घटकांवर अन्याय होत आहे. मात्र, शासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, शिवाय प्रश्न प्रलंबित राहत असल्याने समाजबांधवातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी सर्व मागण्यांची निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.