ETV Bharat / state

जेवणाच्या सुट्टीतील डाव हुकला, नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात - लातूर

तालुक्यातील गंगापूर येथे तक्रादाराच्या वडिलांनी जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीच्या अनुषंगाने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित कागदपत्रे फेर ओढण्यासाठी तलाठ्याकडे पाठविण्यासाठी इंद्रजित गरड (वय३९) याने ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

जेवणाच्या सुट्टीतील डाव हुकला, नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:45 AM IST

लातूर - जमीन खरेदीसंदर्भात तल्हाठ्यास फेर ओढण्यास सांगण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणारा नायब तहसीलदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. इंद्रजित गरड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी सर्व अधिकारी आणि कर्मचारी जेवणासाठी गेले असता, गरड लाचेची रक्कम घेणार होता. तेवढ्यात तहसील कार्यलय परिसरातच त्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

जेवणाच्या सुट्टीतील डाव हुकला, नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

तालुक्यातील गंगापूर येथे तक्रादाराच्या वडिलांनी जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीच्या अनुषंगाने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित कागदपत्रे फेर ओढण्यासाठी तलाठ्याकडे पाठविण्यासाठी इंद्रजित गरड (वय ३९) याने ३५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये ठरविण्यात आले होते. आज दुपारी तहसील कार्यालय परिसरात यापैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना गरडला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. दुपारच्या सुट्टीत न जेवताच दारी आलेली लाचेची रक्कम घेण्यासाठी गेलेला गरड उपाशीपोटीच थेट लाच लुचपत कार्यालयात रवाना झाला.

याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर तहसील कार्यालयात कमालीची शांतता निर्माण झाली होती. पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे अधीक तपास करत आहेत.

Intro:जेवणाच्या सुट्टीत नायब तहसीलदार गरड यांचा डाव हुकला एसीबी चा मात्र यशस्वी सापळा
लातूर : जमीन खरेदी प्रकरणातील फेर ओढण्यासाठी तलाठयांना सांगतो बदल्यात १५ हजाराची लाच स्वीकारणारा नायब तहसीलदार लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. मंगळवारी दुपारी सर्व अधिकारी- कर्मचारी जेवणासाठी गेले असता नायब तहसीलदार इंद्रजित गरड हे लाचेची रक्कम स्वीकारणार होते तेवढ्यात तहसील कार्यलय परिसरातच त्यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.
Body:तालुक्यातील गंगापूर येथे तक्रादाराच्या वडिलांनी जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या जमिनीच्या अनुषंगाने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित कागदपत्र फेर ओढण्यासाठी तलाठी यांच्याकडे पाठविण्यासाठी इंद्रजित गरड (वय३९) यांनी ३५ हजाराची लाच मागितली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये ठरविण्यात आले होते. आज दुपारी तहसील कार्यालय परिसरात यापैकी १५ हजाराचा पहिला हप्ता घेताना त्यांना एसीबी च्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. दुपारच्या सुट्टीत न जेवताच दारी आलेली लाचेची रक्कम घेण्यासाठी गेलेले गरड हे उपाशापोटीच थेट लाच लुचपत कार्यालयात रवाना झाले. याप्रकरणी शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाई नंतर तहसील कार्यालयात कमालीची शांतता निर्माण झाली होती. Conclusion:पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एसीबीचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे अधीक तपास करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.