लातूर - शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव तलावाजवळ एका सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हा घातपात कुणी केला, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरापासून जवळच धनेगाव तलाव आहे. तलावालागतच सडलेल्या अवस्थेतील मृतदेहाने दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाहणी केली असता हा एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या सुटकेसमध्ये छिन्न-विचित्र अवस्थेत असलेल्या मृतदेहामुळे अद्याप ओळखही पटलेली नाही. घटनास्थळी लातूर ग्रामीणचे पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, पोलिसांनी बलात्कार करून हत्या केली असल्याची शंका वर्तविला आहे. या महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने सुटकेसमध्ये टाकून तलावात फेकून दिल्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.
हेही वाचा - लातुरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चा; बाजारपेठ, बससेवा बंद
हेही वाचा - जळकोटमध्ये भाजप तालुकाध्यक्ष पदावरून दोन गटात राडा