ETV Bharat / state

निर्णयाची अंमलबजावणी; 11 आई-वडिलांच्या खात्यांमध्ये मुलांच्या पगाराची रक्कम

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने आई-वडिलांचा सांभाळ केला नाही तर, त्यांच्या पगारामधील काही रक्कम आई-वडिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. हा निर्णय केवळ कागदावर राहिला नाही तर, 11 कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांच्या खात्यावर पगाराच्या 30 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे लातूर जिल्हा परिषदेच्या या अनोख्या पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे.

लातूर जिल्हा परिषद कर्मचारी न्यूज
लातूर जिल्हा परिषद कर्मचारी न्यूज
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:06 PM IST

लातूर - वृद्धपकाळात कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांचा सांभाळ होत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या. यावरून, जो कर्मचारी आई- वडिलांचा सांभाळ करीत नाही त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम ही आई-वडिलांना देण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत झाला होता. त्यानुसार 11 पालकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार रक्कम आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

निर्णयाची अंमलबजावणी; 11 आई-वडिलांच्या खात्यांमध्ये मुलांच्या पगाराची रक्कम

हेही वाचा - सूर्या धरणाचे पाणी, रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधितांच्या मागण्यांसाठी उपोषण

सांभाळ न करणाऱ्या मुलांच्या पगारातील 30 टक्के रक्कम वृद्ध माता-पित्यांच्या खात्यावर जमा

लातूर जिल्हा परिषदेने घेतलेल्या वृद्ध माता-पित्यांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगारातून 30 टक्के कपात करून आईवडिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय लातूरच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. याबाबतीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्याकडे 11 प्रकरणात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यात माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग व पंचायत विभागातील 11 कर्मचारी आईवडील यांचा सांभाळ करत नसल्याचे स्पष्ट झाले. त्याबद्दल स्वतः अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सुनावणी घेतली होती. समाधानकारक उत्तरे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाली नाहीत. यामुळे या 11 कर्मचाऱ्यांच्या पगारातून 30 टक्के पगार कपात करून थेट आई-वडिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. हा राज्यातील जिल्हा परिषदेचा पहिलाच उपक्रम राबविला आहे

राज्यातील जिल्हा परिषदेचा पहिलाच उपक्रम

राज्यात लातूर जिल्हा परिषद ही आईवडिलांच्या म्हातारपणी सांभाळ न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगार कपात करून थेट आईवडिलांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेणारी राज्यातील दुसरी जिल्हा परिषद आहे या महत्त्वाकांक्षी घेतलेल्या निर्णयाची थेट अंमलबजावणी करण्यात येत असून स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे आपल्या दालनात सुनावणी घेत आहेत व तक्रारी मिटवत आहेत. तर कपात करून आई वडिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी योग्य कार्यवाही करत आहेत.

हेही वाचा - गावाच्या विकासासाठी 'तृतीयपंथी' अंजलीने खोचला पदर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.