ETV Bharat / state

मनसेचे दुसरे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन लातुरात सुरू.. ठाकरेंची अनुपस्थिती - मनसे दुसरे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणि शेती संबधित इतर बाबींची माहिती मिळावी यासाठी मनसेच्यावतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी लातूर येथे पाच दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:03 PM IST

लातूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला मंगळवारी सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात राज्यभरातून शेतीशी संबधित स्टॉल लावण्यात आले आहेत. राज्यातील विविध भागातून शेतकरी लातूरमध्ये दाखल झाले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात

मागील आठ दिवसांपासून या कृषी प्रदर्शनाची तयारी केली जात होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने जिल्ह्यातील तरुणांसह इतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. मात्र, ऐन वेळी त्यांचा दौरा रद्द झाला. लातूर हा कायम अवर्षणाचा भाग राहिला आहे. या भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या कृषी प्रदर्शनाचे आयोजन लातूर येथे केल्याचे लातूर मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकच्या बाटल्यांपासून उभारणार अंगणवाडी केंद्रांच्या इमारती

मनसेने कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवला आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसायातील अडचणी वाढत आहेत, सरकारचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि या प्रदर्शनातून त्यांना लाभ व्हावा यासाठी पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे, अशी माहिती अभिजित पानसे यांनी दिली.

उद्घाटन कार्यक्रमाला राज ठाकरे हे अनुपस्थित असले तरी समारोपाच्या समारंभाला ते उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले.

Intro:मनसेचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन लातुरात; दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची ओळख
लातूर : मनसेचा दुसऱ्या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास मंगळवारी प्रारंभ झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ह्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनात राज्यभरातून कृषिसंदर्भात स्टॉल लावण्यात आल्याने त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल असे प्रतिपादन अभिजित पानसे यांनी केले. पहिल्या दिवशी जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी दाखल झाले होते.

Body: गेल्या आठ दिवसांपासून याची तयारी केली जात आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्याने जिल्ह्यातील तरुणांसह अन्य तर कार्यकर्तेमध्ये उत्साह होता. मात्र ऐन वेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. त्यामुळे अभिजित पानसे यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. लातूर हा कायम आवर्षणाचा भाग राहिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळेच या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले. पाच दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. तर उत्पादन वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. मनसेच्या वतीने कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला आहे. दिवसेंदिवस शेती व्यवसायातील अडचणी वाढत आहेत तर सारकरचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि या प्रदर्शनातून त्यांना लाभ व्हावा हा उद्देश ठेवण्यात आल्याचे अभिजित पानसे यांनी स्पष्ट केले.

Conclusion:उद्घाटन कार्यक्रमास राज ठाकरे हे अनुपस्थित असले तरी निरोप समारंभास येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.