लातूर - जिल्ह्यातील उदगीर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29वर पोहोचली होती. त्यामुळे ग्रीनझोनमध्ये असलेला लातूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. शहरात पहिला रुग्ण 25 एप्रिलला आढळला. त्या पहिल्या बाधित महिलेचा मृत्यू झाला होता. त्यांनतर त्या महिलेच्या संपर्कातील तब्बल 28 जणांना कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवसानंतर यापैकी 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या 9 जणांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 20 दिवसांमध्ये उदगीर शहरातील रुग्णांची संख्या ही 29 वर गेली होती. तर यामध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. मात्र, संचारबंदी आणि शहराच्या सीमा सील करून कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. गेल्या 5 दिवसांपासून संशयित रुग्णांची संख्या घटत आहे. तर कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे.
रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही तर 19 मे पर्यंत उदगीर शहर पर्यायाने लातूर जिल्हा हा कोरोनामुक्त होणार आहे हे नक्की.