ETV Bharat / state

Steroid injections : भरतीसाठी आलेल्या तरुणांनी घेतले स्टेरॉइड इजेक्शन; इंजेक्शनचा सापडला खच - भरतीसाठी आलेल्या तरुणांनी घेतले स्टेरॉइड इजेक्शन

सैन्यदलाच्या भरतीदरम्यान अनेक तरुण स्टेरॉइडचे इजेक्शन ( Many young people taking steroid injections ) घेत असल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वच्छतागृहामध्ये हा स्टेरॉइड इजेक्शनचा खच ( This is steroid injection in toilet ) पाहायला मिळाला. गंभीर बाब म्हणजे या इंजेक्शनच्या ओव्हर डोसमुळे काही तरुण बेशुद्ध सुद्धा ( Some young people unconscious due to overdose ) पडल्याची घटना समोर आली आहे.

Steroid injections
भरतीसाठी आलेल्या तरुणांनी घेतले स्टेरॉइड इजेक्शन
author img

By

Published : Dec 11, 2022, 10:21 AM IST

कोल्हापूर : गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूरात सैन्यदलाची अग्निवीर भरती सुरू ( Army recruitment starts in Kolhapur ) आहे. मात्र याच भरतीदरम्यान अनेक तरुण स्टेरॉइडचे इजेक्शन ( Many young people taking steroid injections ) घेत असल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरती प्रक्रिया जिथे सुरू आहे, त्याच्याच बाजूला असलेल्या स्वच्छतागृहामध्ये हा स्टेरॉइड इजेक्शनचा खच ( This is steroid injection in toilet ) पाहायला मिळाला. गंभीर बाब म्हणजे या इंजेक्शनच्या ओव्हर डोसमुळे काही तरुण बेशुद्ध सुद्धा ( Some young people unconscious due to overdose ) पडल्याची घटना समोर आली आहे.

यंत्रणेची उडाली तारांबळ : इंजेक्शनचा खच सापडल्यानंतर भरती प्रक्रिया राबविणाऱ्या यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. भरती प्रक्रियेत सर्वात महत्वाचा टप्पा असतो तो म्हणजे धावणे. धावण्याच्या प्रत्येक गटात जवळपास 250 ते 300 तरुण असतात. मात्र त्यातील सुरुवातीला जे 25-30 तरुण पहिला येतात त्यांनाच पुढच्या चाचणीला बोलावले जाते. त्यामुळे याच चाचणीत पास होण्यासाठी काही तरुणांकडून स्टेरॉइड इजेक्शन घेतल्याचे समोर आले आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये हे इंजेक्शन सापडले असून यानंतर याचे मोठे रॅकेट असल्याची गंभीर बाब सुद्धा आता समोर येण्याची शक्यता आहे. हे इंजेक्शन जवळपास 5 हजारांना एक मिळते अशी माहिती मिळत असून आता या तरुणांच्या बॅग प्रवेशद्वारावरच तपासणे गरजेचे आहे.

पोलिसांनी सुद्धा याचा तपास करणे गरजेचे : या गंभीर प्रकरणानंतर पोलीसांनी सुद्धा असे काही रॅकेट आहे का याबाबत तपास करणे गरजेचा आहे. भरती प्रक्रियेत तरुणांना या इंजेक्शनच्या आहारी घालविण्यासाठी कोणी प्रयत्न करून मालामाल होत आहे का याचा तपास होणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.