ETV Bharat / state

कोल्हापुरात व्हॉट्सअप ग्रुपचे शटर बंद; अ‌ॅडमिनने घेतली काळजी

अयोध्या निकलानंतर समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट कोणीही समाज माध्यमात पसरवू नये, यासाठी सायबर शाखेची प्रत्येकावर नजर होतीच. पण नेटकऱ्यांनी स्वतःहून आज आपले व्हॉट्सअप ग्रुपचे सेटिंग करुन ठेवले होते.

कोल्हापुरात व्हॉट्सअप ग्रुपचे शटर बंद; अडमिनने घेतली काळजी
author img

By

Published : Nov 9, 2019, 11:18 PM IST

कोल्हापूर - गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियाच्या वापरावर स्वतःहून ताबा ठेवल्याचे दिसून आले आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात व्हॉट्सअपवरील सर्वच ग्रूपवर सायबर शाखेची नजर होती.

हेही वाचा- अयोध्येचा निकाल एका पक्षाचा जय नसून संविधानाचा विजय - माजी न्यायमूर्ती सावंत

अयोध्या निकलानंतर समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारच्या पोस्ट कोणीही समाज माध्यमात पसरवू नये, यासाठी सायबर शाखेची प्रत्येकावर नजर होतीच. पण नेटकऱ्यांनी स्वतःहून आज आपले व्हॉट्सअप ग्रुपचे सेटिंग करून ठेवले होते. अ‌ॅडमिन सोडून इतर कोणीही ग्रूपवर पोस्ट करू शकणार नाही. अशा पद्धतीचे सेटिंग प्रत्येक व्हॉट्सअप ग्रूपवर अ‌ॅडमिनने केल्याचे कोल्हापुरात पाहायला मिळाले. अनेक ग्रूपवर स्वतःहून प्रत्येक अ‌ॅडमिनने काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले.

Intro:गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज राम मंदिर बाबरी मशीद प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरू होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील अनेक नेटकऱ्यांनी सोशल मिडियाच्या वापरावर स्वतःहून ताबा ठेवल्याचे दिसून आले आहे. आज संपूर्ण जिल्ह्यात व्हाट्सअपवरील सर्वच ग्रूपवर सायबर शाखेची नजर होती. अयोध्या निकलानंतर समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट कोणीही समाज माध्यमात पसरवू नये यासाठी सायबर शाखेची प्रत्येकावर नजर होतीच पण नेटकऱ्यांनी स्वतःहून आज आपले व्हाट्सअप ग्रुपचे सेटिंग करून ठेवले होते. अडमीन सोडून इतर कोणीही ग्रूपवर पोस्ट करू शकणार नाही अशा पद्धतीचे सेटिंग प्रत्येक व्हाट्सअप ग्रूपवर अडमीनने केल्याचे कोल्हापूरात पाहायला मिळाले. अनेंक ग्रूपवर स्वतःहून प्रत्येक अडमीनने स्वतःहुन काळजी घेतल्याचे पाहायला मिळाले.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.