ETV Bharat / state

सीसीटीव्ही : महिला दिनीच कोल्हापुरात महिलेची बसखाली उडी घेत आत्महत्या

author img

By

Published : Mar 8, 2021, 5:16 PM IST

महिला दिनीच एका महिलेने एसटी बसखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना कोल्हापुरातील शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

edited photo
संपादित छायाचित्र

कोल्हापूर - महिला दिनीच कोल्हापुरातील एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आले आहे. एका महिलेने चालत्या एसटीबस खाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. आज (दि. 8 मार्च) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवरील मलबार हॉटेल समोर ही घटना घडली आहे. हॉटेलसमोरच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. या घटनेची नोंद शाहुपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

सीसीटीव्ही

घटनाक्रम

सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक एसटी कोल्हापूर बसस्थानकाकडे निघाली होती. यावेळी मलबार हाॅटेल समोर असलेल्या दुभाजकावर एक 50 ते 55 वर्षांची महिला बराच वेळ बसली होती. मात्र, अचानकच तिने एसटीखाली उडी घेतली. एसटीच्या चाकाखाली सापडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. संबंधित महिलेला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हेही वाचा - वादग्रस्त झेंड्याच्या विरोधात बेळगावमध्ये मोर्चा; कोल्हापुरातील शिवसैनिकांना सीमेवरच पोलिसांनी घेतले ताब्यात

हेही वाचा- 'फाशी झाली तरी चालेल, पण मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.